बिपाशा बासूला पाण्याची खूप भीती वाटते, कारण तिला पोहता येत नाही. नुकतेच अलोन या हॉरर चित्रपटाच्या शुटींगदरम्यान केरळच्या ब्लॅकवॉटर्समध्ये बिपाशाला करण सिंह ग्रोवरसोबत जेट स्कीवर बसायचे होते. बिपाशा खूप घाबरली होती. एका वळणावर करणला एक शार्प टर्न घ्यावा लागला. तो मागे वळला तेवढय़ात स्की उलटले. बिपाशा पाण्यात पडली, आणि गटांगळ्या खाऊ लागली. त्यावेळी करणने पाण्यात उडी मारली, आणि बिपाशाला किना:यावर आणले. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला दोन तास लागले. या घटनेमुळे ती खूप घाबरली होती.