Join us  

Kapil Sharma Wedding : फुलांनी सजले कपिल शर्माचे घर, गिन्नीच्या हातांवर सजली मेहंदी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:03 AM

कॉमेडी किंग कपिल शर्मा उद्या १२ डिसेंबरला बोहल्यावर चढतोय. गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत कपिल लग्नगाठ बांधणार आहे. कपिल शर्मा आपल्या अमृतसर येथील घरी पोहोचला आहे. कपिलचे घर नववधूच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्मा उद्या १२ डिसेंबरला बोहल्यावर चढतोय. गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत कपिल लग्नगाठ बांधणार आहे. कपिल शर्मा आपल्या अमृतसर येथील घरी पोहोचला आहे. कपिलचे घर नववधूच्या स्वागतासाठी सज्ज आहे. अख्खे घर फुलांनी सजवण्यात आले आहे. तूर्तास या लग्नाचे विधी सुरू आहेत. प्री-वेडिंग सेलिबे्रशनचे काही फोटो समोर आले आहेत.

गिन्नीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो तूर्तास व्हायरल होत आहेत. एका फोटो गिन्नीच्या हातांवर कपिलच्या नावाची मेहंदी सजलेली दिसतेय. तर या फोटोत कपिलची आई हातांवर मेहंदी काढतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.   गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता.

याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते

. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे.

कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.  गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार आहे.

 

टॅग्स :कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथकपिल शर्मा