कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वादामुळे दोघांच्याही करिअरमध्ये खूपच अडचणी आल्या. पण, आता ते वाद थंड झाल्याने त्यांचे चित्रपटाचे शूटिंगही व्यवस्थितपणे सुरू झाले आहे. हृतिक ‘काबील’ मध्ये तर कंगना ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कंगना राणावतला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने तिच्यासोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्या अभिनेत्यांच्या संख्येत वाढच होत आहे. आता या यादीत इरफान खानचे नाव समाविष्ट झाले आहे. वेल, इरफान खान हा स्वत: एक चांगला अभिनेता असून त्याला कंगनासोबत काम करावेसे वाटते आहे, म्हटल्यावर चांगलेच आहे ना! इरफानला तिच्यासोबत काम करावयाचे आहे असे कळाल्यानंतर मात्र कंगनालाही प्रचंड आनंद झाला. तिच्यासोबत काम करण्यासाठी तो किती उत्सुक आहे हे सांगताना तो म्हणतो,‘ एक वेळ स्क्रिप्टची मागणी असेल की, ‘कंगना हिरो बनणार आणि मला ‘हिरोईन’ व्हावे लागणार असेल तर मी त्यासाठीही तयार आहे.
कंगना झाली आनंदित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2016 02:27 IST