‘क्वीन’ या चित्रपटाच्या यशानंतर आता कंगना रानावतला अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. एवढेच नव्हे, तर जाहिरातींसाठी कंगनाने तगडी फी घ्यायला सुरुवात केली आहे. सूत्रंनुसार कंगनाला अनेक ब्रँड्च्या ऑफर येत आहेत. नुकतेच एका आईवेअर कंपनीने त्यांच्या प्रॉडक्ट लाईनसाठी कंगनाशी संपर्क केल्याची बातमी आहे. यासाठी कंगनाला चार कोटींची ऑफर दिल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे. सूत्रंनुसार काही वर्षापूर्वी आमिर खानने या ब्रँडची जाहिरात केली होती; पण पुढे या कंपनीने अनोळखी चेह:यांना संधी द्यायचे ठरवले. आता आईवेअरच्या नव्या प्रॉडक्टसाठी कंगना योग्य असल्याचे कंपनीचे मत आहे, त्यामुळे त्यांनी कंगनाशी संपर्क केला असून तिला चार कोटींची ऑफर दिली आहे. कंगनाची बहीण रंगोली हिने या बातमीला दुजोरा दिला आहे.