Join us

कंगना काळी जादू करायची, एक्स बॉयफ्रेंडचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 13:43 IST

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाचे काही किस्से सांगितले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 28 - अभिनेत्री कंगना राणावत सध्या ह्रतिक रोशनसोबत सुरु असलेल्या वादामुळे चर्चेत आहे. दरदिवशी होणारे नवे आरोप प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत. नेमक कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं ? हे सिद्ध होणं अजून बाकी आहे. पण आता या वादात कंगना राणावतचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने उडी मारली आहे. कंगना काळी जादू करायची असा खुलासा अध्ययन सुमनने केला आहे. डीएनएला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असतानाचे काही किस्से सांगितले आहेत. 
 
'एका रात्री कंगनाने मला फोन करुन पूजेसाठी घरी बोलावलं. पूजा रात्री 12 वाजता सुरु होणार होती त्यामुळे मी 11.30 वाजता पोहोचलो होतो. कंगनाच्या घरात छोटीशी गेस्ट रुम आहे जी पुर्णपणे काळ्या कपड्याने झाकण्यात आली होती. पडदेदेखील काळ्या रंगाचे लावण्यात आले होते. काही देवांच्या मुर्ती ठेवण्यात आल्या होत्या. आग लावण्यात आली होती आणि या सगळ्या वातावरणात पूजा सुरु होती. कंगनाने मला काही मंत्रही बोलण्यास सांगितले. हे सर्व चालू असताना मला तिने रुममध्ये लॉक केलं होतं. मी काहीच केलं नाही आणि भीतीने घराबाहेर आलो. यानंतर कंगना मला अनेकदा पल्लवी नावाच्या व्यक्तीकडे घेऊन जाऊ लागली. एकदा पल्लवीने रात्री 12 वाजता स्मशानभुमीत जाऊन काही गोष्टी फेकण्यास सांगितलं होतं. पण मी गेलो नाही', असा खुलासा अध्ययन सुमनने केला आहे.
'हे सर्व सुरु असल्याने माझ्या घरच्यांना काळजी वाटू लागली होती. माझ्या आईने घरच्या पंडितांना घरी बोलावलं. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला ती तुझ्यासाठी जेवण बनवते का ? जेव्हा मी हो म्हणालो तेव्हा त्यांनी जेवणात रक्त मिसळत असल्याचं सांगितलं. शहरात वाढलो असल्याने आणि परदेशात शिकलो असल्याने या गोष्टींवर मी विश्वास ठेवला नाही. काळ्या जादूपासून मी नेहमी लांबच राहिलो होतो. पण मी एकदा माझ्या टॅरोट रिडरकडे गेलो होतो तेव्हा तिने पहाडी प्रदेशातील व्यक्ती तुझ्यावर काळी जादू करत असल्याचं सांगितलं. त्यावेळी मी फक्त कंगनालाच ओळखत होतो जी पूजा करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये जायची.या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा सल्ला मला देण्यात आला होता असं अध्यययने सांगितलं आहे.  
 
'त्यावेळी मी कंगनामध्ये इतका अडकलो होतो की कोणी तिच्याबद्द्ल वाईट बोललं तर मला सहन व्हायचं नाही. आमच्यामधील शारिरीक हिंसादेखील वाढली होती. माझ्या जागी जर दुसरा कोणी मुलगा असता तर त्याने उलट हात उचलला असता. पण मी कधीच हात उचलला नाही. मला उत्तर द्यायचं होतं पण माझा हात थांबायचा. मी खूप घाबरलो होतो. रोज रात्री माझ्या पीआरजवळ मी रडायचो. सत्य स्विकारण्याची स्थिती नव्हती म्हणून मी नेहमी दारु प्यायचो. एक वेळ तर अशी आली होती की दारुमुळे माझा मृत्यू झाला असता किंवा मला वेड तरी लागलं असतं', असं अध्ययन सुमनने म्हटलं आहे.
माझं करिअर पुर्णपणे थांबलं होतं. राज 2 सारखा सुपरहिट चित्रपट मी केला आहे पण माझ्याबद्दल बोलण्यात कोणालाच रस नाही. मी माझा उतार पाहण्यास सुरुवात केली. तिला एकीकडे यथ मिळत असताना माझे चित्रपट मात्र बंद होत होते. आताही त्याबद्दल बोलण्याची भीती वाटते असं अध्ययन सुमन बोलला आहे.