‘क्वीन’ या चित्रपटातील अभिनयाने कंगना राणावत सध्या यशो शिखरावर आहे. आधी कंगनाला घ्यायला तयार नसलेले दिग्दर्शक तिला घेऊन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे संजय लीला भन्साळी. भन्साळी यांनी कंगनाला मुख्य भूमिकेत घेऊन एक म्युझिकल फिल्म प्लान केली आहे. ‘बाजीराव मस्तानी’चे शूटिंग झाल्यानंतर ते हा चित्रपट बनवणार आहेत. कंगनाला त्यांची स्क्रिप्ट आवडली असून तिने होकार दिल्याचे कळते.
हा चित्रपट २0१५ मध्ये
सुरू होईल.