Join us

"बिग बॉस"चे सूत्रसंचालन कमल हसनकडे

By admin | Updated: May 16, 2017 19:06 IST

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार कमल हसन छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. "बिग बॉस" या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या तमिळ व्हर्जनचे सूत्रसंचालन कमल हसन करणार आहे.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 16 - बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार कमल हसन छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. "बिग बॉस" या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या तमिळ व्हर्जनचे सूत्रसंचालन कमल हसन करणार आहे. या दिग्गज अभिनेत्याला टेलिव्हिजनवर पाहण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतात. तमिळ व्हर्जनच्या बिग बॉसचे ट्रेलर नुकतेच टीझर रिलीज झाले आहे. य़ामध्ये कमल हसन सलमान खानची नक्कल करताना दिसतोय. तमिळ बिग बॉसचे घर तयार करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. इव्हीपी थिम पार्कवर बनलेल्या या भव्य घरावर एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करण्यात आला आहे. सध्या बिग बॉसची टीम शोमध्ये सहभागी होणाऱ्या 15 स्पर्धकांची यादी तयार करत असून, त्यात दोन क्रिकेटपटूंचाही समावेश असेल. या शोचे पहिले पर्व 18 जूनपासून विजय टीव्ही वाहिनीवर सुरु होणार आहे. 

हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन , सलमान खान, अर्शद वारशी, संजय दत्त यांनी केले आहे. सलमान खानच्या सूत्रसंचलनाच्या वेगळ्या पद्धतीमुळे या शोचा टीआरपी गगणाला भिडला होता. बिग बॉसच्या सुरुवातीच्या काही एपिसोड्सचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर कमल हसन सुभाष नायडू या विविध भाषी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहेत.