Join us  

"अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले, प्रॉपर्टीही विकली"; KRK देश सोडून जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:50 PM

Kamaal Rashid Khan : केआरके हा नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतो. आपल्या ट्विट्समुळे त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं.

अभिनेता कमाल राशिद खान उर्फ केआरके हा नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतो. आपल्या ट्विट्समुळे त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. यानंतर आता पुन्हा नवा दावा त्याने केला आहे. "अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले आहेत आणि माझी सर्व प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईत आता माझं फक्त एक घर आणि ऑफिस आहे. माझ्याविरोधातील खोट्या केसेसमुळे मी हे पाऊल उचललं आहे" असं ट्विट केआरकेने केलं आहे. त्याच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

"अखेर मी भारतातील माझे सर्व व्यवसाय बंद केले आहेत आणि माझी सर्व प्रॉपर्टी विकली आहे. मुंबईत आता फक्त माझं एक घर आणि ऑफिस आहे. तेसुद्धा लवकरच विकलं जाणार आहे. माझ्याविरोधातील खोट्या केसेसमुळे मी हे पाऊल उचललं आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करण्याची परवानगी कोणालाच नसली पाहिजे" असं ट्विट केलं आहे. तसेच केआरकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं.

"जगात कुठेही एखाद्या व्यक्तीला त्याच्या ट्विट्समुळे तुरुंगात पाठवलं जाऊ शकत नाही. हे फक्त भारतातच होऊ शकतं. विविध ट्विट्ससाठी एखाद्या व्यक्तीविरोधात पोलीस तीन एफआयआर कसं काय दाखल करू शकतात? हे ट्विट्स 2016, 2018, 2019 आणि 2020 मध्ये केले होते" असंही केआरकेने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

केआरकेने 2005 मध्ये ‘सितम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानेच या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि तोच यात मुख्य अभिनेता होता. त्यानंतर 14 नोव्हेंबर 2008 मध्ये त्याचा ‘देशद्रोही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात तो मुख्य भुमिकेत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :कमाल आर खान