Join us  

कोट्यवधींची कमाई करणारा प्रभास राहतो भाड्याच्या घरात; किती घरभाडे भरतो माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 3:06 PM

भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास.

भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज त्याने जगभरात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या प्रभास बहुप्रतिक्षित पॅन इंडिया चित्रपट 'कल्की 2898 एडी'मुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. त्यामुळे या सुपरस्टारनं लंडनमध्ये एक घर भाड्यानं घेतलं आहे. 

रिपोर्ट्सनुसार, प्रभास लंडनमधील या आलिशान घरात राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, सुपरस्टार दर महिन्याला 60 लाख रुपये भाडे देतो. नाव दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये सामील आहे. तो खूप आलिशान जीवन जगतो.  प्रभासचं हैदराबादमध्ये एका आलिशान घर आहे. ज्याची किंमत 65 कोटी रुपये आहे. प्रभासला लक्झरी कारचाही शौक आहे. त्याच्याकडे Range Rover Sports, Audi A6, BMW 7 Series सारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत, ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हा सुपरस्टार सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.  प्रभास 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. 500 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट यंदाच प्रदर्शित होणार आहे. प्रभास लवकरच 'राजा डिलक्स' या हॉरर कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. 

टॅग्स :प्रभाससेलिब्रिटीसिनेमालंडन