Join us  

काजोल डीडी ले जायेगी, प्रसारभारतीमध्ये वर्णी लागणार

By admin | Published: June 18, 2015 11:45 AM

दुरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असून या कामात आता अभिनेत्री काजोल सरकारची मदत करण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ - दुरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असून या कामात आता अभिनेत्री काजोल सरकारची मदत करण्याची शक्यता आहे. प्रसारभारतीच्या बोर्डावर सात प्रस्तावित सदस्यांमध्ये काजोलचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील अंतिम निर्णय उपराष्ट्रपती घेणार आहेत. 

दुरदर्शन, आकाशवाणीची जबाबदारी असलेल्या प्रसारभारतीसमोर दुरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्याचे आव्हान आहे. सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारने दुरदर्शनला नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. चित्रपट व टीव्ही जगतात काम करणा-या ख्यातनाम मंडळींनी यासाठी  मदत करावी अशी माहिती व प्रसारण मंत्रालयाची भूमिका आहे. यानुसार मंत्रालयाने प्रसारभारती बोर्डातील सात अर्ध वेळ सदस्यांची यादी तयार केली आहे. यात अभिनेत्री काजोल, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार अशोक टंडन आदी मंडळीचा समावेश आहे. गृहमंत्रालयानेही या यादीला हिरवा कंदील दाखवला आहे. आता उपराष्ट्रपती सात पैकी चार सदस्यांची निवड करतील अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.