Join us

चक्क कपडे न घालता जॉन अब्राहमने काढला फोटो, विचारतोय माझे कपडे कुठे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:57 IST

जॉनने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर त्याचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

ठळक मुद्देजॉनने शेअर केलेल्या फोटोत त्याने कपडे घातलेले नाहीये. केवळ त्याच्या पायावर एक उशी आपल्याला दिसत आहे.

जॉन अब्राहम त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवर त्याचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

जॉनने शेअर केलेल्या फोटोत त्याने कपडे घातलेले नाहीये. केवळ त्याच्या पायावर एक उशी आपल्याला दिसत आहे. तो सोफ्यावर बसलेला असून माझे कपडे कुठे आहेत असे तो विचारत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत तू हॉट दिसतोय असे त्याचे चाहते त्याला सांगत आहेत. केवळ आठ तासांत सहा लाखाहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

बॉलिवूडच्या पिळदार शरीरयष्टी असलेल्या अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमचे नाव सर्वात वर आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या जॉन अब्राहमने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:चे खास स्थान निर्माण केले. कॉलेज जीवनात मॉडेलिंगची सुरुवात, मग काही म्युझिक व्हिडीओ आणि यानंतर मीडिया प्लानर असा सगळा प्रवास करत करत जॉनला ‘जिस्म’ या सिनेमात संधी मिळाली. यानंतर त्याने पाप, लकीर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला यश मिळाले नाही. यादरम्यान यश राज फिल्मसच्या ‘धूम’ हा सिनेमा जॉनला मिळाला आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

जॉनने साया, टॅक्सी नं 9211, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, परमाणू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो एक चांगला अभिनेता असण्यासोबतच त्याने एक निर्माता म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकी डोनर या प्रसिद्ध चित्रपटाची त्याने निर्मिती केली होती.

टॅग्स :जॉन अब्राहम