मराठी चित्रपट सध्या आशय-विषयात सरस ठरत असल्यामुळे चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही हे चित्रपट भरारी घेत आहेत. जेमतेम महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे यांची भूमिका असलेला ‘मितवा’ सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरलाय. मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या अशा नात्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या ‘मितवा’ने म्हणे एका महिन्यात ५ कोटींचा बिझनेस केला आहे. ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच चांगली बाब आहे.
मितवाची भरारी
By admin | Updated: March 14, 2015 00:58 IST