Join us  

"मी आई आहे आणि माझ्यामुलीसाठी..." सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटकेनंतर जियाची आई राबिया खान यांचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 4:27 PM

न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती.

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणा निकल आज १० वर्षांनी लागला आहे.   या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती. कोर्टाचा निकाला ऐकून त्या दु:खी झाल्या पण जियासाठी ही लढाई लढत राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सूरज पांचोलीच्या निर्दोष सुटका झाल्यानंतर जिया खानच्या आई राबिया खान यांनी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. राबिया खान म्हणाल्या, 'मी सुरुवातीपासूनच सांगत आहे की, हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं नाही, तर हत्या आहे. हे खुनाचे प्रकरण आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. माझा लढा सुरूच आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलीसाठी का नाही लढणार?

न्यायालयाने निकाल सुनावण्यापूर्वी जियाची आई राबिया यांनीही त्यांच्या वकिलामार्फत आज अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने राबिया खान यांच्या अर्जावर विचार केला नाही आणि निकाल देताना सूरज पांचोलीची जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते आणि त्यानंतर दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

10 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी न्यायालयाने निर्णय सूरज पांचोलीच्या बाजूने निकाल देत या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता केली. जिया खान 3 जून 2013 रोजी घरात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

टॅग्स :सुरज पांचोली