Join us  

‘जान्हवी’ने घेतली माधुरी दीक्षितची जागा

By admin | Published: November 04, 2015 3:36 AM

विविध वृत्तवाहिन्यांच्या मालिका पाहण्याबरोबरच ब्रेकमध्ये जाहिराती बघणाऱ्या प्रेक्षकवर्गाची संख्याही काही कमी नाही.... म्हणून मग कंपन्यांच्या विविध प्रॉडक्टसाठी घराघरात

विविध वृत्तवाहिन्यांच्या मालिका पाहण्याबरोबरच ब्रेकमध्ये जाहिराती बघणाऱ्या प्रेक्षकवर्गाची संख्याही काही कमी नाही.... म्हणून मग कंपन्यांच्या विविध प्रॉडक्टसाठी घराघरात पोहोचलेला चेहरा आणण्याचा फंडा आजमावला जाऊ लागला आहे. अगदी अंकुश चौधरी पासून ते पंकज विष्णू, सचित पाटील, गिरीजा ओक या मराठमोळ्या सेलिब्रिटीजची वर्णी जाहिरातींमध्ये लागली आहे...विचार करा, एका मोठ्या स्टारच्या जागी छोट्या पड्द्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीला स्थान मिळाले तर काय होईल... प्रेक्षकांसाठी तर हा आश्चर्याचा सुखद धक्काच ठरेल! आता ही अभिनेत्री कोण? नक्की कोणाबद्दल बोललं जात आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच तुम्हाला लागली असेल....तर ऐका ती अभिनेत्री आहे...काहीही हं श्री....असं म्हणणारी जान्हवी उर्फ तेजश्री प्रधान. एका जाहिरातीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षीतचे दर्शन प्रेक्षकांना होत होते...तिच्या जागी ‘तेजश्री’ दिसू लागली आहे. तेजश्री ची प्रसिद्धधी पहाता ‘माधुरी आऊट आणि तेजश्री इन’’...असे म्हणून तेजश्री भाव खाऊन गेली आहे.