Join us  

'आपला माणूस' शिव ठाकरेला येत आहे कुटुंबाची आठवण; म्हणाला - 'कितीही मोठं कामं असलं तरी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:20 PM

शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो.

 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिव त्याच्या डॅशिंग अंदाजाबरोबरच त्याच्या स्वभावामुळेही ओळखला जातो. शिव ठाकरेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.  सध्या शिवच्या अशाच एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिव ठाकरे सध्या 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच माध्यमांशी बोलताना तो म्हणाला,  'इकडे स्टंट आणि अजून बरचं काही करु घेत आहेत. कुठं-कुठं दुखतंय ते आता नंतर सांगतो. पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. खा-प्या...कोणत्याही गोष्टीचा त्रास करुन घेऊ नका. जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं'

'शिवाय घरच्यांना सांभाळा. तुम्हाला कितीही मोठं काम असलं तरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा. मला पहिल्यांदाच याची जाणीव होत आहे. किती जर काम मिळाले, मोठ्या गोष्टी मिळाल्या तरी जर कुटुंबसोबत नसेल तर त्यात काही मजाच नाही. मी इतक्या दिवसांपासून बाहेर आहे. मी पण दिवाळीला घरी जाणार आहेट, या शब्दात त्यांनी कुटुंबाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 

 रिएलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्यात शिववर त्याच्या वागणुकीमुळे कौतुकाचा वर्षाव होत असतो.  'बिग बॉस सीझन 16', 'खतरों के खिलाडी सीझन 13' आणि आता 'झलक दिखला जा सीझन 11' मधून शिव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'झलक दिखला जा सीझन 11' हा शिव ठाकरेचा वर्षातील तिसरा रिअ‍ॅलिटी शो असणार आहे. त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.

टॅग्स :शीव ठाकरेटेलिव्हिजनसेलिब्रिटी