Join us  

साऊथमध्ये जान्हवी कपूरचा डंका! ज्युनिअर एनटीआरनंतर आता झळकणार राम चरणसोबत, यादीत सूर्याचंही नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:12 AM

Janhvi Kapoor : 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आता दक्षिण चित्रपटसृष्टीत नशीब आजमावणार आहे.

'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आता दक्षिण चित्रपटसृष्टीत नशीब आजमावणार आहे. तिने साऊथ स्टार राम चरणसोबत हा चित्रपट साइन केला असून दोघेही 'RC 16'मध्ये दिसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बुची बाबू सना याचे दिग्दर्शन करणार आहेत. आता जान्हवीचे वडील आणि निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी iDream मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जान्हवी कपूरने याआधी ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा'साठी शूटिंग केले आहे. त्यांना प्रत्येक भाग आवडला. लवकरच ती राम चरणसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. बोनी कपूर म्हणाले की राम चरण आणि ज्युनियर एनटीआर खूप चांगले काम करत आहेत.

जान्हवी पाहते तेलुगु सिनेमे

जान्हवी स्वतःवर खूप मेहनत घेत आहे. ती अनेक तेलुगु चित्रपट पाहत आहे. तसेच, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत काम करायला मिळणे तिला खूप भाग्यवान वाटत आहे. ६८ वर्षीय बोनी कपूर म्हणाले की, 'आशा आहे की चित्रपट चालतील आणि तिला आणखी काम मिळेल. लवकरच ती अभिनेता सूर्यासोबत काम करणार आहे. माझ्या पत्नीने (श्रीदेवी) अनेक भाषांमध्ये काम केले आहे, मला आशा आहे की माझी मुलगीही तेच करेल.

वर्कफ्रंट..

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी शेवटची नितेश तिवारीच्या 'बवाल'मध्ये दिसली होती. यात वरुण धवनही मुख्य भूमिकेत होता. आता ती राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. दोघांनी यापूर्वी 'रुही' चित्रपटात एकत्र काम केले आहे. याशिवाय जान्हवीचा गुलशन दैवेयासोबत 'उलझन' देखील येत आहे. यात रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, मियांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी यांच्याही भूमिका आहेत.

टॅग्स :जान्हवी कपूरराम चरण तेजाज्युनिअर एनटीआर