Join us  

सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल, एका इंजिनिअरची 'स्वप्नपूर्ती'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:51 PM

'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिलं जातं. आजवर या शोमुळे कलाविश्वाला अनेक दिग्गज गायक, गायिका मिळाले आहेत. त्यामुळे हा शो लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या यादीत कायम प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. हिंदी कलाविश्वात हा शो गाजल्यानंतर त्याचं मराठी व्हर्जनही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आज या मराठी इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले पार पडला. त्यामध्ये, पनवेलचा सागर म्हात्रे महिला मराठी इंडियन आयडॉल ठरला आहे.  

'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे स्पर्धकांपैकी एकाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार होती. म्हणूनच, इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अतिशय रंगदार आणि रोहर्षक झालेल्या या स्पर्धेत पनवेलच्या सागर म्हात्रेने बाजी मारली. 

पेशाने इंजिनियर असणारा हा तरुण त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतो आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्स मिळाला. सागरला बाइक्स मॉडिफाय करण्याची आवड आहे. तो इंजिनियर असला, तरी त्याच्या संगीतावरच्या प्रेमाने, श्रद्धेने आणि उत्तम रियाजाने तो हळहळू स्पर्धेचा टप्पा पार करतो आहे. सलग तीन आठवडे सुरेल सादरीकरण करून सागरने परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्सची हॅट्ट्रिक मिळवली. एवढंच नाही तर त्याच्या 'रमता जोगी' या गाण्याला परीक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशनसुद्धा मिळालं होतं. अखेर इंडियन आयडॉलच्या पहिल्या ट्रॉफीवर सागर म्हात्रेचं नाव कोरलं. 

अभिजीत सावंत पहिला इंडियन आयडॉल

दरम्यान, इंडियन आयडॉल हिंदीच्या पहिल्या सीझनचाही विजेता ठरलेला तोही मराठमोळा अभिजीत सावंत. या स्पर्धेनंतर त्याच्या यशाचा आलेख चढताच राहिला. त्यानं नुकतंच आपल्या कारकीर्दीची १७ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यानं आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. इंडियनच्या आयडलच्या पहिल्या सीझनपासून ते आतापर्यंतचा त्याचा प्रवास हा त्यानं फोटोंच्या माध्यमातून व्हिडिओतून दाखवला होता. 

टॅग्स :इंडियन आयडॉलपनवेलमुंबईअजय-अतुल