Join us  

स्विमिंग पूल ते क्लब हाऊस! जॅकलीनने खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 1:28 PM

Jacqueline fernandez: जॅकलीन आता कपूर कुटुंबाची शेजारी झाली आहे. पाली हिलमध्ये तिने आलिशान घर खरेदी केलं आहे.

बॉलिवूडमधील श्रीलंकन ब्युटी म्हणजे जॅकलीन फर्नांडिस (jacqueline fernandez). उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अल्पावधीत जॅकलीनने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं. बऱ्याचदा सिनेमांमुळे चर्चेत येणारी जॅकलीन मध्यंतरी ठग सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे चर्चेत आली होती. परंतु, आता यावेळी ती तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आली आहे.

जॅकलीनने नुकतंच एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे.  जॅकलीनने पाली हिल येथील एका पॉश भागात हे घर घेतलं असून लवकरच ती कपूर कुटुंबाची शेजारी होणार आहे.  या भागात अनेक बॉलिवूड स्टार्स राहतात. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी जॅकलीनने खरेदी केलेल्या घराची इमारत दाखवली आहे. जॅकलीनचं हे नवीन खर वांद्रे पश्चिम येथे आहे. तिच्या घराशेजारीच रणबीर कपूर आणि करिना कपूर यांचं घर आहे.

कसं आहे जॅकलीनचं नवीन घर?

जॅकलीनने पाली हिल येथील नवरोज इमारतीमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. तिचं नवीन घर 1119 स्क्वेअर फूट असून 2557 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया आहे. जॅकलीनच्या या इमारतीमध्ये असलेली सगळी घरं 3 BHK आणि 4 BHK आहेत. यांची किंमत 12 कोटी रुपयांपासून पुढे आहे. विशेष म्हणजे या घरातच क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि जिमची सोय आहे.

दरम्यान, घरामुळे चर्चेत येत असलेली जॅकलीन लवकरच वैभव मिश्राच्या 'फतेह' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सोनू सूद आणि विजय राजदेखील स्क्रिन शेअर करणार आहेत. तसंच ती 'जीतेगा तो जिएगा' या अॅक्शन स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे.  

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसेलिब्रिटीरणबीर कपूर