Join us  

खळबळजनक! कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री पोहचल्या टॉपवर, ईशा कोप्पीकरचा दावा

By तेजल गावडे | Published: October 03, 2020 12:35 PM

कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपवर पोहचल्या आहेत, असा दावा ईशाने केला आहे.

बॉलिवूडमधील कास्टिंग काउचची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. त्यात मीटू मोहिमे अंतर्गत बऱ्याच अभिनेत्रींनी पुढाकार घेत आपल्यावर घडलेल्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडली होती. त्यात आता अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने आता अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. कास्टिंग काउचच्या मदतीने बऱ्याच अभिनेत्री बॉलिवूडमध्ये टॉपवर पोहचल्या आहेत, असा दावा ईशाने केला आहे.

अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील नेपोटीझम, कास्टिंग काऊच आणि ड्रग्ज संदर्भात मोकळेपणाने खुलासे केले. अनेक बॉलिवूड अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या मदतीने टॉपवर पोहोचल्या असेही ती म्हणाली. यादरम्यान तिने हृतिक रोशनच्या एका चित्रपटातील संवादही उदाहरण म्हणून वापरला. 'सुपर ३०' या चित्रपटात एक संवाद आहे. यात ऋतिक रोशन 'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा वो बनेगा, जो हकदार होगा', असे बोलतो. मात्र असे संवाद फक्त चित्रपटात चांगले वाटतात, सत्य वेगळेच असते, असे म्हणत मी मात्र माझ्या मेहनतीने इंडस्ट्रीत नाव कमावले असेही ईशाने म्हटले.

नेपोटिझम म्हणा किंवा कोणाच्या फेव्हरमध्ये असणे म्हणा. यामुळे आउटसाइडर्सला नुकसान होते. मात्र असेही नाही की प्रत्येक स्टार किड्स काही विशेष करून दाखवतात, अनेकदा आउटसाइडर्स मेहनतीच्या बळावर त्यांच्यापेक्षा जास्त काही मिळवतात. माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे, असे ईशा म्हणाली. पुढे तिने कास्टिंग काउचच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ती म्हणाली की, सिनेइंडस्ट्रीत कास्टिंग काऊच चालते. मात्र तुम्हाला कास्टिंग काऊचच्या मदतीने पुढे जायचे की स्वः बळावर नाव कमवायचे हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. अनेक बड्या अभिनेत्री याच्या सहाय्याने टॉपवर पोहोचल्या आहेत. पण तुम्हाला असे करायचे नसेल तर अजिबात करू नका. नेहमी तुमच्यासमोर पर्याय असतो. मला रात्री चांगली झोप आवडते.

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन...बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबद्दल ईशा कोप्पीकर म्हणाली की, कुणावर टीका करण्याचा मला अधिकार नाही आणि अशा प्रकरणात कुणाच्याही भावनेला ठेच पोहचू शकते. ती पुढे म्हणाली की, एक व्यक्ती आपल्या कंपनीसाठी ओळखली जाते ज्याला तो सोबत ठेवतो. मी माझ्याबद्दल बोलू शकते. मी या गोष्टीचा कधी सामना केला नाही आणि नाही मी कधी असे काम केले ज्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. पण मला वाटते की ड्रग्स माफियांवर लगाम बसवली पाहिजे. कारण यामुळे युवा पिढीचे नुकसान होत आहे. यावर कारवाई करण्याची गरज आहे. 

टॅग्स :इशा कोप्पीकरअमली पदार्थमाधुरी दिक्षितदीपिका पादुकोण