Join us  

लग्नाला आली नाही म्हणून प्रियांकावर परिणीती चोप्रा नाराज? भारतात येऊनही बहिणीला न भेटताच परत गेली देसी गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 3:17 PM

परिणीतीच्या साखरपुड्यात प्रियांका हजर होती. पण, लाडक्या बहिणीच्या लग्नाला प्रियांकाने हजेरी लावली नव्हती. लग्नाला न आल्यामुळे प्रियांकावर परिणीती नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

चोप्रा सिस्टर्स सध्या बॉलिवूड गाजवत आहेत. प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रानंतर मन्नारा चोप्राही अभिनयात तिचं नशीब आजमावत आहेत. चोप्रा सिस्टर्समधील प्रेम अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून आलं आहे. शिवाय प्रियांका तिच्या बहिणींसाठी अनेकदा पोस्टही करताना दिसते. प्रियांकाचं तिच्या बहिणींबरोबर खास नात आहे. तर चोप्रा सिस्टर्सही प्रियांकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवतात. त्यांच्यासाठी प्रियांका खास आहे. म्हणूनच की काय परिणीती लाडक्या बहिणीवर नाराज असल्याचं दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वीच होळीच्या निमित्ताने देसी गर्ल भारतात आली होती. प्रियांका पती निक आणि लेक मालतीसह स्वदेशी परतली होती. भारतात आलेल्या प्रियांकाने अयोध्येतील राम मंदिरासह अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. याबरोबरच मन्नारा चोप्राच्या बर्थडे पार्टीतही ती सहभागी झाली होती. पण, या पार्टीत परिणीती दिसली नाही. तर भारतात येऊनही देसी गर्ल बहिणीला भेटल्याशिवायच परत गेली. त्यामुळे आता परिणीती आणि प्रियांकामध्ये बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

परिणीतीच्या साखरपुड्यात प्रियांका हजर होती. पण, लाडक्या बहिणीच्या लग्नाला प्रियांकाने हजेरी लावली नव्हती. लग्नाला न आल्यामुळे प्रियांकावर परिणीती नाराज असल्याच्या चर्चा आहेत. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, मन्नाराने तिच्या बर्थडे पार्टीत प्रियांका आणि निकला बोलवलं होतं. पण, परिणीती नाराज असल्याने तिला या पार्टीचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्याबरोबरच परिणीती आणि मन्नारादेखील एकमेकींच्या जास्त जवळ नाहीत. याउलट प्रियांका आणि मन्नाराचं नातं वेगळं आहे. त्यामुळेदेखील मन्नाराने परिणीतीला पार्टीत बोलवलं नसल्याचं सांगितलं जात आहे. 

परिणीती लग्नानंतर प्रियांकाला भेटलीच नसल्याचंही यामध्ये म्हटलं आहे. पण, परिणीती सध्या तिच्या आगामी चमकिला या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली नाहीये. पण, याबबात अद्याप प्रियांका किंवा परिणीतीने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

टॅग्स :प्रियंका चोप्रापरिणीती चोप्रासेलिब्रिटी