Join us  

भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, फोटो पाहून नेटकरी म्हणाले - करा की लग्न राव..!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:50 AM

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याच्या या फिटनेसवर लाखो तरुणी घायाळ आहेत. पण, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याच्या या फिटनेसवर लाखो तरुणी घायाळ आहेत. पण, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण फरहान अख्तरच्या मेहुणीला डेट करत असल्याच्या चर्चा वारंवार होताना दिसतात. सोशल मीडियावर भूषण आणि अनुषा दांडेकर(Anusha Dandekar)चे फोटो पाहून त्यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता गुढी पाडव्या निमित्त पारंपारिक अंदाजात त्या दोघांनी फोटोशूट केले आहे. ते पाहून चाहते त्यांना लग्न करा असे सांगत आहेत. 

भूषण प्रधान सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि तो बऱ्याचदा फोटोशूट, आगामी प्रोजेक्ट आणि वर्कआउट करतानाचे फोटो शेअर करत असतो. दरम्यान आता त्याने गुढी पाडव्यानिमित्त फोटोशूट केले. ते त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत त्याच्यासोबत शिबानी दांडेकरदेखील पाहायला मिळत आहेत. ते दोघे मराठमोळ्या गेटअपमध्ये दिसत आहेत. त्याने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, यावर्षी भेटा अवनी आणि अभयला. खरेतर ते दोघे जुनं फर्नीचर या मराठी सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 

या फोटोशूटमध्ये भूषणने अफव्हाइट रंगाचा कुर्ता घातला आहे. तर अनुषाने जांभळ्या रंगाची नववारी साडी नेसली आहे. केसांचा आंबाडा बांधून त्यावर गजरा घातला आहे. कानात झुमके, गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या घालून तिचा लूक परिपूर्ण केला आहे. यासोबतच नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर लावली आहे. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाया फोटोशूटमध्ये त्या दोघांनी एकत्र पोझ दिल्या आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कुणी हार्ट इमोजी टाकत आहे तर कुणी त्यांच्या आउटफिटचं कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, प्लीज लग्न करा, तुम्ही एकत्र छान दिसता. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, करा की लग्न राव..! आणखी एकाने लिहिले की, खूप सुंदर जोडी..प्लीज लग्न करा. सुंदर कपल, काय जोडपं आहे, अप्रतिम अशा कमेंट्स केल्या आहेत.  

टॅग्स :भुषण प्रधानअनुषा दांडेकर