Join us  

हायकोर्टाच्या न्यायाधीशांची मुलगी आहे शिल्पा शिंदे, जाणून घ्या बिग बॉस 11 च्या विनरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 11:56 AM

बिग बॉस 11 च्या ट्रोफीवर मराठमोठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपलं नाव कोरलं आहे.

मुंबई- बिग बॉस 11 च्या ट्रोफीवर मराठमोठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आपलं नाव कोरलं आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या रिअॅलिटी शोमध्ये शिल्पाला हिना खानने तगडी टक्कर दिली होती. शेवटपर्यंत या शोचा विजेता कोण होणार? हे सांगणं कठीण होतं. पण अखेरीस शिल्पा शिंदेने बिग बॉस 11चं जेतेपद तिच्या नावे केलं.शिल्पा शिंदेचा जन्म 28 ऑगस्ट 1977 रोजी मुंबईत झाला. शिल्पाचे वडील हायकोर्टात न्यायाधीश होते. चार बहिण-भावांमध्ये शिल्पा तिसरी मुलगी आहे. शिल्पाला सोडून तिच्या तिन्ही भावा-बहिणींचं लग्न झालं आहे. शिल्पाची मोठी बहिण शुभा शिंदे मुंबईमध्ये राहत असून ती गृहिणी आहे. 

शिल्पाची दुसरी बहिण तृप्तीचंही लग्न झालं असून ती युएसमध्ये स्थायिक आहे. शिल्पाचा लहान भाऊ आशुतोष बँकेत नोकरी करत असून शिल्पाची वहिनीही नोकरी करते. शिल्पाने सायकलॉज म्हणून पदवी घेतली आहे. शिल्पा तिची मोठी बहीण अर्चनाच्या जास्त जवळ आहे. शिल्पा शिंदेने तिचं करिअर 1999मध्ये सुरू केलं. सुरूवातील तिने विविध मालिकांमधून भूमिका साकारल्या. भाभी, संजीवनी, आम्रपाली आणि मिस इंडिया अशा विविध शोमध्ये ती सहभागी होती. बिग बॉसमधील शिल्पाच्या खेळीमुळे तिच्या फॅन्सच्या संख्येत जास्त वाढ झाली आहे.  

बिग बॉसमध्ये आपली कलाकारी दाखविणारी 40 वर्षीय शिल्पा आजही सिंगल आहे. अंगुरी भाभीच्या नावाने ओळखली जाणारी शिल्पा अभिनेता रोमित राजबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.  

टॅग्स :शिल्पा शिंदे