Join us  

कान्समध्ये 'इंडियाना जोन्स'ला मिळालं ५ मिनिटांचं स्टॅण्डिंग ओव्हेशन, हॅरिसन फोर्डचे पाणावले डोळे, म्हणाला - माझे आयुष्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 6:34 PM

cannes 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये 'इंडियाना जोन्स' या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर पार पडला.

कान्स(Cannes 2023)च्या प्रसिद्ध कार्लटन बीचवर इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी(Indiana Jones And The Dial Of Destiny)साठी डिस्ने आणि लुकास फिल्मच्या फोटो कॉलमधील फोटो आता उपलब्ध आहेत. चित्रपटात दाखवलेल्या टुक-टुकच्या समोर समुद्र किनाऱ्यावर हॅरिसन फोर्ड, फिबी वॉलर-ब्रिज, मॅड्स मिकेलसेन, बॉयड हॉलब्रुक, इथन इसिडोर आणि दिग्दर्शक, सह-लेखक जेम्स मॅंगॉल्ड हे कलाकार होते. हा चित्रपट ३० जून रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हॅरिसन फोर्ड, ज्याला कान्स २०२३ मध्ये मानद पाल्म डी’ओर मिळाला आहे, तो इंडियाना जोन्स आणि डायल ऑफ डेस्टिनी या आगामी चित्रपटासह प्रिय इंडियाना जोन्स पात्राचा निरोप घेण्यास तयार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरला हा अभिनेता उपस्थित होता. या अभिनेत्याचे टाळ्यांच्या कडकडाटात हार्दिक स्वागत करण्यात आले. प्रीमियरनंतर, चित्रपटाला ५ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून हॅरिसन फोर्डचे डोळे पाणावले. फोर्ड म्हणाला, मी हे पाहून खूप प्रभावित झालो आहे. जेव्हा तुम्ही मरणार असाल, तेव्हा तुम्हाला तुमचे आयुष्य तुमच्या डोळ्यांसमोर दिसते आणि मी फक्त माझ्या डोळ्यांसमोर माझे आयुष्य चमकताना पाहिले. माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग, परंतु माझ्या संपूर्ण आयुष्याचा नाही. माझे जीवन माझ्या प्रिय पत्नीने सक्षम केले आहे, जिने माझी आवड आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला आहे आणि मी कृतज्ञ आहे.

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवल