Join us  

ध्येयासमोर कोरोनाची भीती मला वाटत नाही: संध्याराणी रसाळ यांनी व्यक्त केल्या भावना

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 04, 2020 3:57 PM

सकाळी आठ वाजता पीपीइ किट अंगावर चढविले की दुपारीच काढावे लागत. त्या दरम्यान तहान लागली तरी पाणी पिता येत नाही.

ठळक मुद्देध्येयासमोर कोरोनाची भीती नाही : संध्याराणी रसाळरसाळ यांचे घरच्यांनी औक्षण करून केले स्वागतकोरोनाचा लढा एखाद्या युद्धासारखा वाटतो

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : सध्या कोरोनाचे १०४ रुग्ण ॲडमिट असलेल्या ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांची सेवा करून 22 दिवसांनी रविवारी घरी परतलेल्या परिसेविका संध्याराणी रसाळ यांचे काल त्यांच्या कुटुंबांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. सात दिवस ड्युटी आणि १५ दिवस क्वारंटाईननंतर त्या घरी परतल्या. येत्या सोमवारी त्या पुन्हा ड्युटीवर जाणार आहेत. ध्येयासमोर मला कोरोनाची भीती अजिबात वाटत नाही अशा भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.

सकाळी नाश्ता झाला की आम्ही आमच्या रुग्णालयातिल गणवेशावर पीपीइ किट घालतो. सकाळी 8 वाजता हे किट अंगावर चढविले की मग ते दुपारी 2.30 - 2:45 काढता पर्यंत येत नाही. या दरम्यान तुम्हाला तहान लागली तरी पाणी पिता येत नाही. दोन हॅन्डग्लोव्हज, दोन मास्क, कोविडचा चष्मा, (आधी नंबरचा चष्मा असेल तर त्यावर कोविडचा चष्मा लावावा लागतो) डबल टोपी असे सगळे घालावे लागते. अंगातील कपडे पूर्ण चिंब भिजत असतात, हे सगळे कठीण असले तरी इलाज नसतो. करण आम्हाला आमचे कर्तव्य निभवायचे आहे. रुग्णांचे जसे मनोबल वाढवतो तसे आम्ही स्वतःला देखील मानसिक आधार देत असतो. आमची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. ड्युटी करून त्या निवासस्थानी गेल्या नंतरच घरच्यांशी आम्ही संपर्क करू शकतो. ऑन ड्युटी असताना स्वतःच्या वस्तुंना देखील हात लावू शकत नाही. मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, दोन मास्क घालावे लागतात त्यामुळे त्रास खूप होतो. किट काढल्यावर आम्ही पाणी पितो. हे सगळे एका लढाई सारखे आहे. मला कोरोनाला घाबरवायचे आहे असेच स्वतःला समजावत असते असे रसाळ सांगत होत्या. त्या 58 वर्षांच्या असून 6 महिन्यांनी सेवा निवृत्त होणार आहे तरीही त्या स्वतःबरोबर आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवत एका योद्धासारखे काम करत आहेत. 15 दिवस ववारंटाईन झाली तेव्हा कुटुंबाची खूप आठवण येत होती. घरचे कोणी सोबत नसल्याने अर्थात मानसिक ताण येत होता परंतु त्यातूनही मी स्वतःला सावरले. घरी आली तेव्हा माझ्या सुनेने भाकरीचा तुकडा ओवाळून, हळदी कुंकू लावून माझे औंक्षण केले. मन खूप भरून आले होते. जणू काही लढाई करून मी समर्थपणे घरी आली असाच आंनद मला होता. माझे पती ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. शाहू रसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केले. मी घरात आल्यावर ही मास्क वापरत आहे, घरात ही आम्ही सोशल डिस्टनसिंग पाळत आहोत. तसेच पुढच्या ड्युटीला जाण्याची मानसिक तयारीही करत आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :ठाणेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्र