Join us

नायक नही खलनायक हूँ मैं

By admin | Updated: August 27, 2016 02:09 IST

आवाज या सीरिजमधील संत ज्ञानेश्वर या मालिकेत अभिनेता सौरभ गोखलेने ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली होती

आवाज या सीरिजमधील संत ज्ञानेश्वर या मालिकेत अभिनेता सौरभ गोखलेने ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली होती. आता सौरभ खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. सौरभ ‘पाहिले ना मी तुला’ या चित्रपटात निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मधुरा देशपांडे प्रमुख भूमिकेत आहे. या भूमिकेबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना सौरभ गोखले सांगतो, ‘कोणत्याही कलाकाराने एकाच प्रकारच्या भूमिका साकारू नये असे मला वाटते. त्याच त्याच प्रकारच्या भूमिका कलाकार साकारायला लागला की त्याचा त्याला कंटाळा येऊ लागतो. तसेच प्रेक्षकदेखील त्याला वेगळया भूमिकेत स्वीकारायला लवकर तयार होत नाही. म्हणून प्रत्येक कलाकाराने विविध प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळत आहेत याचा मला आनंद आहे. मी पहिल्यांदाच नायक नव्हे तर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे थोडे चित्रीकरण शिल्लक आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’’