दे सी गर्ल म्हणजेच प्रियंका चोप्रा ही बॉलीवूडमध्ये कित्येक वर्षांपासून आपले बस्तान जमवून बसली आहे. तिने केवळ अभिनयातच स्वत:चे महत्त्व सिद्ध केले आहे असे नाही तर ती उत्तम गाऊही शकते, हे दाखवून दिले आहे. आता ती इंग्रजी टीव्हीवरही डेब्यू करू इच्छित आहे. ती सध्या अमेरिकी टीव्ही शो ‘क्वांटिको’ करण्यात व्यस्त आहे. एवढे सर्व मिळवल्यानंतरही ती म्हणते, की मी अजून न्यू कमर आहे! खरंतर प्रियंका प्रथमच आंतरराष्ट्रीय टीव्हीवर काम करू पाहात आहे. तिचा हा शो खूप चर्चेत आहे. एका कार्यक्रमात तिने पाहिले की तिचा शो रसिकांना खूप आवडतोय. यावेळी ती म्हणाली, की टीव्हीच्या एपिसोडसाठी शूट करताना खूप चांगला अनुभव येत आहे.
मी अजून ‘न्यू कमर’!-देसी गर्ल
By admin | Updated: August 16, 2015 23:03 IST