Join us  

'पैशांपेक्षा जास्त मी शत्रू बनवले', पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगना राणौतने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 6:57 PM

अभिनेत्री कंगना राणौतला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगना राणौतला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान कंगना राणौतने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले आहेत. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभार मानले आहेत.

कंगनाने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद जाहीर करत म्हटले की, मित्रांनो, एक कलाकार असल्याच्या नात्याने मला जास्त प्रेम, सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. मात्र आज जीवनात पहिल्यांदा एक आदर्श नागरिक असल्याच्या नात्याने मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. मी आभारी आहे या देशाची आणि या सरकारची. जेव्हा मी कमी वयात करिअरची सुरूवात केली होती तेव्हा बराच मोठा काळ मला यश मिळाले नव्हते. ८ ते १० वर्षांनंतर मला यश मिळाले. त्या यशाचा उपभोग न घेता बऱ्याच गोष्टींवर काम करायला मी सुरूवात केली.

कंगना राणौत पुढे म्हणाली की, मी फेअरनेस प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करायला नकार दिला. आयटम साँग केले नाही. मोठ्या अभिनेत्यांच्या सिनेमात, मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाउसमध्ये काम करण्यास नकार दिला. खूप शत्रू बनवले. पैशांपेक्षा जास्त शत्रू बनवले. मग आणखीन जास्त जागरूकता आली देशासंदर्भातील. देशाला तोडणारी जेहादी किंवा खलिस्तानी असो वा शत्रू देश असो. त्यांच्या विरोधात आवाज उठविला. माझ्यावर खूप सारे केस दाखल आहेत.

हा पुरस्कार खूप लोकांचे तोंड बंद करेल- कंगनाकंगना पुढे म्हणाली की, नेहमी लोक मला विचारतात की काय मिळते हे सगळे करून का करतेस? हे तुझे काम नाही. तर मी त्या लोकांना मला आज सांगायचे आहे की, हा पद्मश्री रुपाने मला जो सन्मान मिळाला आहे तो खूप लोकांचे तोंड बंद करेल. मी मनापासून देशाचे आभार मानते.कंगना राणौत शिवाय गायक अदनान सामीला देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :कंगना राणौतपद्मश्री पुरस्कार