Join us  

हृतिक हॉलीवूडच्या वाटेवर

By admin | Published: June 06, 2014 9:06 PM

हृतिक रोशनला त्याच्या लुक्समुळे ग्रीक गॉड म्हटले जाते. त्याचा लुक्स आणि बॉडी हॉलीवूडमध्ये मॅच होण्यासारखी आहे.

हृतिक रोशनला त्याच्या लुक्समुळे ग्रीक गॉड म्हटले जाते. त्याचा लुक्स आणि बॉडी हॉलीवूडमध्ये मॅच होण्यासारखी आहे. त्यामुळे हृतिकने हॉलीवूडमध्ये काम करायला हवे असे म्हटले जात होते. आता हृतिकनेही ते मनावर घेतले आहे. लवकरच हृतिक फास्ट अँड फ्युरियसचा दिग्दर्शक रॉब कोहेन याच्या आगामी अॅक्शन चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. नुकतेच रॉबने भारतात येऊन हृतिकची भेट घेतली होती. एवढेच नव्हे, रॉबने रोशन कुटुंबियांसोबत डिनरही केले होते, त्यामुळे लवकरच हृतिक एका हॉलीवूड चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी टि¦लाईटची अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टने हृतिकच्या क्रिश-3 मधील लूकची प्रशंसा केली होती. ती म्हणाली होती की, जेव्हा मला मुलगा होईल, तेव्हा त्याचा लुक्स हृतिकसारखा असावा, अशी माझी इच्छा आहे.’