Join us

ह्रितिक रोशन - यामी गौतम ‘काबिल’साठी एकत्र

By admin | Updated: February 8, 2016 20:34 IST

भिनेता ह्रितिक रोशन आणि ‘विक्की डोनर’ फेम यामी गौतम ‘काबिल’ या आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत, दिगदर्शक प्रेषकांसाठी प्रत्येक वेळी नवीन जोडी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - होय, अभिनेता ह्रितिक रोशन आणि ‘विक्की डोनर’ फेम यामी गौतम ‘काबिल’ या आगामी चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत, दिगदर्शक प्रेषकांसाठी प्रत्येक वेळी नवीन जोडी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. 
काबिल हा एक प्रेमकथेवर अधारित चित्रपट असून आतापर्यंत न झालेली प्रेम कहाणी असेल असे सांगण्यात येत आहे. प्रेषकांना आज प्रत्येक गोष्टीत नवेपणा हवा असतो. ‘काबिल’ या चित्रपटाचे दिगदर्शन संजय गुप्ता करणार आहेत. तर चित्रपटाची निर्मीती राकेश रोशन करणार आहेत. 
 
संजय गुप्ता गुप्ता यांनी नुकताच जज्बा हा चित्रपट दिगदर्शित केला आहे. अभिनेत्री यामी गौतम सध्या सनम रे या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. तर अभिनेता ह्रितिक रोशन मोहंजदडो च्या शेवट्या सत्रातील शुटींग संपवत आहे. 
अभिनेता ह्रितिक रोशन याने ट्विटर याचा खुलासा केला.