रॅपर हनीसिंगच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पाय घसरून पडल्याने हनीसिंग जबर जखमी झाला आहे. डॉक्टरांनी त्याला ‘बेडरेस्ट’चा सल्ला दिला आहे. त्याचा परिणाम ‘सलाम’ टूरवर झाला आहे. याचाच अर्थ हनीसिंग आता शाहरुखसोबत टूरवर जाऊ शकणार नाही. शाहरुखच्या टीमसोबत हनीसिंग हा वॉशिंग्टन, न्यूजर्सी आणि ह्यूस्टन येथे ‘परफॉर्म’ करणार होता. जखमी झाल्याने आता तो अमेरिकेत होणाऱ्या या तीन कार्यक्रमांत सहभागी होऊ शकणार नाही. हनीसिंगचे अमेरिकेत मोठ्या संख्येने चाहते असून, त्याला भेटण्याची ते अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत होते. अमेरिकेतील हे तीन कार्यक्रम हिट करण्याची जबाबदारी आता एकट्या शाहरुखवर पडली आहे.
हनीसिंग जखमी
By admin | Updated: September 29, 2014 06:20 IST