Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस प्रॅटला कोणी समजले स्टंट डान्सर?

By admin | Updated: January 1, 2017 03:56 IST

हॉलीवूड सुपरस्टार क्रिस प्रॅट जर समोर आला तर कोण त्याला कोण ओळखणार नाही? असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा! कारण ‘पॅसेंजर्स’ चित्रपटाच्या सेटवर

हॉलीवूड सुपरस्टार क्रिस प्रॅट जर समोर आला तर कोण त्याला कोण ओळखणार नाही? असे जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा! कारण ‘पॅसेंजर्स’ चित्रपटाच्या सेटवर दोघे जण असे होते ज्यांनी त्याला ओळखलेच नाही. त्यांना तर क्रिस कोणी तर स्टंट करणारा डान्सर आहे असे वाटले. ते होते खुद्द त्याची को-स्टार जेनेफर लॉरेन्सचे आजी-आजोबा. होय, जेनिफरचे आजी-आजोबा जेव्हा ‘पॅसेंजर्स’ चित्रपटाच्या सेटवर आले होते तेव्हा त्यांनी क्रिसला ओळखले नव्हते. ती म्हणाली की, ‘माझे आजी-आजोबा जेव्हा सेटवर आले होते तेव्हा क्रिस नाचत होता. त्यामुळे त्यांचा असा गैसमज झाला की, तो स्टंट डान्सर आहे. त्यांना आजही क्रिस डान्सरच वाटतो.’ जेव्हा त्यांनी मीडियामध्ये जेनिफर आणि क्रिसचे फोटो पाहिले तेव्हासुद्धा त्यांचा गैरसमज दूर झाला नाही. ते तिला म्हणाले की, ‘हा स्टंट डान्सर तर खूपच पुढे गेला. तुझ्यासोबत त्याचे फोटो छापून येताहेत.’ यावर जेनिफर तरी काय म्हणाणार होती. आॅस्कर विजेती जेनिफर लॉरेन्स आणि क्रिस प्रॅट आगामी ‘पॅसेंजर्स’ चित्रपटात एकत्र दिसणार असून येत्या ६ जानेवारी रोजी इंंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.