Join us  

टायगर Vs मार्व्हल्स! 'द मार्व्हल्स' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; सलमानच्या अडचणीत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 3:46 PM

बॉलिवूडचा लाडका टायगर सलमान खानचा 'टायगर 3' आणि  'द मार्व्हल्स' एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

मार्व्हल्सच्या सुपरहिरो चित्रपटांचे जगभरात चाहते आहेत. अशातच कॅप्टन मार्व्हल्सच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे.  'द मार्व्हल्स' चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. तर बॉलिवूडचा लाडका टायगर सलमान खानचा 'टायगर 3' आणि 'द मार्व्हल्स' एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींसाठी यंदाची दिवाळी  कायम लक्षात राहील अशी ठरणार आहे.

 निया डाकोस्टा दिग्दर्शित 'द मार्व्हल्स' या चित्रपटात पहिल्यांदाच एक-दोन नव्हे तर तीन सुपरवुमन एकत्र दिसणार आहेत. मार्व्हल सिरीजच्या या चित्रपटात कॅप्टन मार्व्हल, मिस मार्व्हल आणि कॅप्टन मोनिका एकत्र मिळून विश्वाला वाचवताना दिसणार आहेत. या चित्रपटात ब्री लार्सन, इमान वेल्लानी आणि टीना पॅरिससोबत सॅम्युअल जॅक्सन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मार्व्हल्स कॉमिक्सवर आधारित 'द मार्व्हल्स' 10 नोव्हेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट भारतात हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलगूसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  'द मार्व्हल्स' सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' चित्रपटाला टक्कर देणार आहे. प्रेक्षकांमधील 'मार्व्हल्स'ची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. अशा परिस्थितीत हा चित्रपट सलमानच्या 'टायगर 3'साठी धोका ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या लढतीत कोण जिंकणार? हे लवकरच कळेल. 

टॅग्स :सलमान खानहॉलिवूडसेलिब्रिटी