SHOCKING : जास्त ‘सेक्सी’ असल्याने या अभिनेत्रीवर लागला बॅन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 11:28 IST
एखाद्या चित्रपटात जास्त सेक्सी सीन्स असल्याने तो चित्रपट बॅन करण्यात आला, असे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र एखादी अभिनेत्री ...
SHOCKING : जास्त ‘सेक्सी’ असल्याने या अभिनेत्रीवर लागला बॅन !
एखाद्या चित्रपटात जास्त सेक्सी सीन्स असल्याने तो चित्रपट बॅन करण्यात आला, असे आपण नेहमी ऐकत असतो. मात्र एखादी अभिनेत्री जास्त सेक्सी असल्याने तिच्यावर चित्रपटात काम करण्यासाठी बॅन लावण्यात आल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. कॅँबोडियाच्या एका अभिनेत्रीवर असाच प्रसंग ओढवला असून ती जास्त सेक्सी असल्याचे कारण दाखवत तिला चित्रपटात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. २४ वर्षीय डेनी क्वॉन असे त्या अभिनेत्रीचे नाव असून ती अगोदर बऱ्याच चित्रपटात दिसली आहे.तिच्या देशाचे कल्चर आणि फाइन आर्ट्स मिनिस्ट्रीसोबत तिचे एक सेशन होते जिथे हा निर्णय घेण्यात आला की, सदर अभिनेत्रीने मंत्रालयाच्या आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. डेनीचे फेसबुकवर सुमारे तीन लाख फॉलोअर्स आहेत. तिने सांगितले की, चित्रपटात तिच्याद्वारे साकारण्यात येणाऱ्या कामुक भूमिका अन्य अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या नाहीत. तसेच एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, ‘कॅँबोडियामध्ये बरेच सेक्सी आर्टिस्ट आहेत. काहीजण तर माझ्यापेक्षा जास्त किसिंग आणि इरॉटिक सीन करतात.’ तिने म्हटले की, ‘मी माझा अधिकार समजते की, मला कसे कपडे परिधान करायचे आहेत. मात्र आपचे कल्चर, कॅँमोडियाचे लोक याला स्वीकार नाही करु शकत.’ या आचार संहितानुसार डेनीवर एका वर्षासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. आता ती १२ महिन्यांपर्यंत चित्रपटासाठी कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाही. मात्र कॅँबोडियाच्या जेंडर अॅँण्ड डेव्हेलपमेंट ग्रुपने मंत्रालयाच्या या निर्णयाची निंदा केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मंत्रालयाचा हा निर्णय नैतिक आणि कायद्याच्या दृष्टिने चुकीचा आहे. मात्र दुसरीकडे मंत्रालयाचे म्हणणे आहे की, डेनीने योग्य पद्धतीने व्यवहार केला नाही. डिसिप्लिनरी काउंसिलचे चिफ चॅमरोउन वैंता यांनी म्हटले की, ‘डेनीवर यासाठी बॅन लावण्यात आला की, तिने मंत्रालयात दिलेल्या लेखी निवेदनाचे उल्लंघन केले होते ज्यात तिने सेक्सी कपडे परिधान न करण्याचे वचन दिले होते.