Join us

SEE PIC : केट हडसन अन् डॅनी फूजिकावा पब्लिकली किस करताना झाले कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 20:23 IST

अमेरिकन अभिनेत्री केट हडसन आणि संगीतकार डॅनी फूजिकावा यांच्यात काहीतरी गुफ्तगू सुरू असल्याची चर्चा होती. काही आठवड्यांपूर्वीच माध्यम क्षेत्रात ...

अमेरिकन अभिनेत्री केट हडसन आणि संगीतकार डॅनी फूजिकावा यांच्यात काहीतरी गुफ्तगू सुरू असल्याची चर्चा होती. काही आठवड्यांपूर्वीच माध्यम क्षेत्रात हे दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचे बोलले जात होते. मात्र लॉस एंजिलिस येथे या दोघांचा असा एक फोटो समोर आला ज्यावरून हे दोघे नात्यात असल्याचे स्पष्ट होते. केट आणि डॅनी पब्लिकली एकमेकांना किस करताना कॅमेºयात कैद झाले आहे. रॉक स्टार क्रिस रॉबिन्सनची पत्नी असलेली केट हडसन गेल्या १९ मार्च रोजी लॉस एंजिलिसच्या रस्त्यांवर डॅनी फूजिकावा याचा हातात हात धरून फिरताना बघावयास मिळाली. यावेळी केट डॅनीला किस करताना दिसली. पीपल डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, डॅनीने केटच्या गळ्यात हात टाकलेला होता. घट्ट मिठीत पकडून तो तिला किस करत होता. यावेळी केट आणि डॅनीने एका कॅफेत एकत्र जेवण केले. त्यानंतर केट तिच्या घराकडे निघाली. मात्र या भेटीदरम्यान दोघांनी पब्लिकली केलेल्या कारनाम्यामुळे त्यांच्यातील नात्यांवर आता चर्चा रंगत आहेत. वास्तविक हे दोघे नात्यात असल्याची सुरुवातीपासूनच कुजबुज सुरू होती. परंतु दोघांकडूनही याविषयी अधिकृतरीत्या बोलले न गेल्यानेच त्यांच्यातील नाते उघड झाले नव्हते. आता किस करतानाचे फोटोज् समोर आल्याने ते दोघे रिलेशनशिप असल्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे. दरम्यान, केटला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. रॉक बॅण्ड ब्लॅक क्रोजचा सदस्य क्रिस ब्राउन याच्यासोबत तब्बल सहा वर्षे संसार केल्यानंतर आॅगस्ट २००६ मध्ये ती त्याच्यापासून विभक्त झाली. त्यानंतर केट रॉक बॅण्ड म्यूजचा गायक मॅट बेलामी याच्यासोबत नात्यात राहिली. मात्र डिसेंबर २०१४ मध्ये त्यांच्यातही ब्रेकअप झाले. आता केटचे नाव डॅनीसोबत जोडले जात आहे.