Join us  

‘Pawn Stars’चा ओल्ड मॅन’ अर्थात रिचर्ड हॅरिसन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 11:35 AM

‘पॉन स्टार्स’ या तुफान गाजलेल्या शोचा ‘ओल्ड मॅन’ अर्थात रिचर्ड हॅरिसन यांनी  सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ७७ वर्षांचे रिचर्ड ...

‘पॉन स्टार्स’ या तुफान गाजलेल्या शोचा ‘ओल्ड मॅन’ अर्थात रिचर्ड हॅरिसन यांनी  सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ७७ वर्षांचे रिचर्ड हॅरिसन दीर्घकाळापासून आजारी होते. काल त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा रिक हॅरिसन याने त्यांच्या निधनाची माहिती दिली. ते माझे हिरो होते आणि मी खूप नशिबवान आहे की, ओल्ड मॅन माझे वडिल होते. ‘पॉन स्टार्स’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला जगभरातील अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आले. एकत्र कुटुंबपद्धती, कुटुंबाप्रती असणारे प्रेम, आपुलकी आणि खुमासदार विनोदांचे क्षण असा हा एक सुरेख प्रवास होता. माझ्या वडिलांनी आयुष्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला, असे त्याने सोशल मीडियावरील आपल्या भावूक पोस्टमध्ये लिहिले आहे. हिस्ट्री वाहिनीवर प्रसारित होणा-या ‘पॉन स्टार्स’ या कौटुंबिक मालिकेत हॅरिसन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्रच कौटुंबिक व्यवसायात कशा नांदल्या, ते दाखवण्यात आले होते. रिचर्ड हॅरिसन हे या कुटुंबातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. ‘ओल्ड मॅन’ म्हणूनचं ते ओळखले हाते.अलीकडे पार्किन्सन डिसीसने त्यांना ग्रासले होते. रिचर्ड हॅरिसन एक माजी नौदल सैनिक होते़ आपल्या शोवर ते आपले अनुभव मांडत़ ८० च्या दशकात त्यांनी वेगास येथे गोल्ड अ‍ॅण्ड सिल्व्हर पॉन शॉप उघडली होती. (प्राचीन  दुर्मिळ वस्तू खरेदी करून त्या विकणे, त्यांचे मुल्यांकन हे काम ते करत.) त्यांचा मुलगा रिकही पुढे त्यांच्या या शॉपमध्ये काम करू लागला. एका प्रोड्यूसरची नजर त्यांच्या या शॉपवर पडली आणि त्यांचे दैनंदिन आयुष्य बघून या निर्मात्याने त्यावर शो बनवून टाकला. २००९ मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित झालेला हा शो अद्यापही लोक विसरू शकलेले नाहीत.