Join us  

Oscars 2022: ऑस्करच्या मंचावर हाणामारी! पत्नीवर घाणेरडा जोक मारल्याने भडकला विल स्मिथ; होस्टला लगावला ठोसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 8:47 AM

लॉस एंजेलिसमधील हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री (२७ मार्च) होणाऱ्या ९४ व्या अकादमी पुरस्कारादरम्यान हा वाद झाला.

ऑस्करचे पुरस्कार म्हणजे जगभरातील सिनेमा आणि अभिनेत्यांसाठी सर्वोच्च सन्मान असतो. याच ऑस्करच्या मंचावर आज विचित्र घटना घडली आहे. प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने (Will Smith) होस्टच्या तोंडावर मुक्का लगावला आहे. 

ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट क्रिस रॉक (Chris Rock) होस्ट करत होता. तेव्हा श्रोत्यांमध्ये अभिनेता विल स्मिथ देखील उपस्थित होता. बोलता बोलता रॉकने स्मिथच्या पत्नीवर घाणेरडा जोक मारला. तो ऐकताच स्मिथचा पारा चढला, व त्याने मंचाकडे धाव घेतली. संतापलेल्या स्मिथने रॉकच्या तोंडावर ठोसा लगावला. 

लॉस एंजेलिसमधील हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री (२७ मार्च) होणाऱ्या ९४ व्या अकादमी पुरस्कारादरम्यान हा वाद झाला. सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्काराची घोषणा करण्यासाठी रॉक मंचावर आला होता. तेव्हा त्याने जेड पिंकेट स्मिथच्या दिसण्याबद्दल विनोद केला. जेडने गेल्या वर्षी एलोपेशियाशी झुंज दिल्यानंतर डोक्यावरील केसांचे मुंडण केले होते. यावरून रॉकने फालतू जोक मारला होता. त्याची परिणती ठोसा लगावण्यात झाली. 

टॅग्स :ऑस्करहॉलिवूड