Join us  

​निकोल किडमन का मानते स्वत:ला देव पटेलची आई!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 1:53 PM

आॅस्कर विजेती अभिनेत्री निकोल किडमनने अनेक दर्जेदार भूमिका केल्या आहेत. पण तिला आगामी ‘लायन’ चित्रपटातील तिची भूमिका खूप जवळची ...

आॅस्कर विजेती अभिनेत्री निकोल किडमनने अनेक दर्जेदार भूमिका केल्या आहेत. पण तिला आगामी ‘लायन’ चित्रपटातील तिची भूमिका खूप जवळची वाटते. चित्रपटात ती प्रमुख अभिनेता देव पटेलची आई बनली आहे. ती भूमिकेशी एवढी समरस झाली की, ती स्वत:ला देव पटेलची खरी आईच मानू लागली आहे.ती म्हणाली की, ‘शूटींग करत असताना सेटवर मी त्याच्या खऱ्या आईप्रमाणेच वागायचे. त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवायचे. आई-मुलाच्या भावनिक पातळीवर मी त्याच्याशी स्वत:ला जोडू शक ले. मी एवढी भूमिकेत शिरले होते की, तो माझाच मुलगा आहे असे मला वाटू लागले.’तिच्या या ‘आॅन स्क्रीन’मुलाच्या करिअरविषयीदेखील ती जागरूक आहे. भविष्यात देव पटेल काय करतो, कसे चित्रपट स्वीकारतो याकडे ती जातीने लक्ष ठेवणार आहे. तिला खात्री आहे की, ‘हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचे वेगळे रुप दिसेल. तो प्रमुख अभिनेता म्हणून समोर येईल. यापुढे तो केवळ इंग्रजी चित्रपटांत भारतीय व्यक्तीरेखा करणारा अभिनेता नाही तर सिनेमाचा हीरो म्हणून ओळखला जाईल.’दिग्दर्शक गॅरेथ डेव्हिसचा हा पहिलाच सिनेमा असून या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात दबदबा निर्माण केला आहे. अनेक पुरस्कारांची लयलूट करणाऱ्या ‘लायन’ला गोल्डन ग्लोबमध्ये चार नामांकने मिळाली आहेत. स्टील : ‘लायन’ चित्रपटातील एका सीनमध्ये देव पटेल.सरू ब्रिअर्ली लिखित ‘अ लाँग वे होम’ नावाच्या पुस्तकावर तो आधारित असून ही एक सत्यकथा आहे. कोलकात्यातील सरू नावाचा ५ वर्षीय मुलगा अपघाताने हरवल्यावर त्याला आॅस्ट्रेलियन दाम्पत्य दत्तक घेऊन आॅस्ट्रेलियाला घेऊन जाते. दूरवर आॅस्ट्रेलियातील टस्मानिया शहरात राहणाऱ्या सरूला मात्र घरची आठवण स्वस्थ बसू देत नाही.भारतात मागे राहिलेल्या मूळ कुटुंबाला भेटण्यासाठी मग सुरू होता त्याचा अवघड शोधप्रवास. ‘गुगल अर्थ’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो घर शोधू लागतो. या प्रवासात त्याला येणारे अनुभवांचे दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे.लायन’ टीम :रूनी मारा, देव पटेल, निकोल किडमन आणि दिग्दर्शक गॅरेथ डेव्हिसदेव पटेल, निकोल किडमन, रूनी मारा या हॉलीवूड कलाकारांबरोबरच अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा यामध्ये काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नवाजुद्दिन सिद्दिकी, प्रियांका बोस, तनिष्ठा चटर्जी आणि दीप्ती नवल यांचा समावेश आहे. ​देव पटेलीच्या बालपणातील भूमिका सनी पवार या आठ वर्षीय मराठमोळ्या बालकलाकाराने केली आहे. सुमारे आठ हजार मुलांमधून सनीची निवड करण्यात आली होती. आॅस्कार विकेंडला हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे,