Join us  

कुटुंबासोबत ख्रिसमस केला साजरा, दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीची आत्महत्या; मुलाच्या शेजारीच...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:35 AM

आदल्या दिवशी आनंदात असणाऱ्या अभिनेत्रीने असं पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.

कोरियन फिल्म इंडस्ट्रीतून धक्कादायक बातमी आली आहे. कालच 'पॅरासाईट' फेम कोरियन अभिनेत्याचा कारमध्ये मृतदेह आढळला. तर आता कोरियन अभिनेत्री बोनी लाई सुक यिनने  (Bonnie Lai Suk Yin) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४७ वर्षीय अभिनेत्रीने २६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. तर त्याच्या आदल्याच दिवशी तिने कुटुंबासोबत उत्साहात ख्रिसमस साजरा केला होता. त्यामुळे तिचं कुटुंब सध्या धक्क्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोनी तिच्या मुलाजवळच बेशुद्धावस्थेत आढळली. तिने घरातच कोळसा जाळून आत्महत्या केली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल  केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आदल्या दिवशी आनंदात असलेली मुलगी दुसऱ्या दिवशी असं पाऊल कसं उचलेल यावर कुटुंबातील सदस्यांचा विश्वास बसत नाहीए. ती ख्रिसमस साजरा करण्यासाठी एक दिवस आधीच घरी गेली होती. सेलिब्रेशनची झलक तिने आपल्या सोशल मीडियावर दाखवली. यामध्ये तिचा पती आणि मुलगाही दिसत आहे. मात्र पुढच्याच दिवशी तिने जगाचा निरोप घेतला. 

कोरियन अभिनेत्री बोनी लाई सुक यिनने 1995 साली अभिनयात पदार्पण केलं. मिस आशिया पेजंट 1995 मध्ये ती रनर अप ठरली.  तिने 'हिरो ऑफ हॉन्गकॉन्ग', 'लेजेंड ऑफ द वोल्फ', 'यंग अँड डेंजरस 3' आणि 'सांग फा सौ सी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. 1998 साली तिने केनेथ लोसोबत लग्न केले. त्यांना दोन मुलं झाले. यानंतर 2006 मध्ये तिचा घटस्फोट झाला तर 2007 मध्ये तिने दुसरं लग्न केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू