Join us  

Joker च्या फॅन्ससाठी खूशखबर! लवकरच येणार २ सीक्वल; अभिनेत्याला मिळालेली ऑफर वाचून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 10:58 AM

'जोकर'च्या सीक्वलसाठी या सिनेमाच्या दिग्दर्शकाने, अभिनेत्या आणि निर्मात्यांनी आधी  कोणताही प्लॅन केला  नव्हता.

टॉड फिलिप्सच्या दिग्दर्शनात बनलेला हॉलिवूड सिनेमा 'Joker' २०१९ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. या सिनेमातील आपल्या अफलातून परफॉर्मन्सने जगभरातील प्रेक्षकांना भारावून सोडणारा अभिनेता Joaquin Phoenix लवकरच जोकरच्या सीक्वलमधून पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Joaquin ला जोकरच्या २ सीक्वलसाठी ५० मिलियन डॉलर म्हणजेच ३६७ कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली आहे.

'जोकर'च्या सीक्वलसाठी या सिनेमाच्या दिग्दर्शकाने, अभिनेत्या आणि निर्मात्यांनी आधी  कोणताही प्लॅन केला  नव्हता. पण या सिनेमाला मोठं यश मिळाल्यानंतर Joaquin आणि सिनेमाचा दिग्दर्शक टॉड दोघेही जोकरच्या सीक्वलची हिंट देत आहेत. Joaquin Phoenix  ने या सिनेमातील त्याच्या परफॉर्मन्ससाठी  अकॅडमी अवॉर्ड जिंकला होता. ऑस्कर २०२० मध्ये या सिनेमाला वेगवेगळी ११ नामांकने मिळाली होती. 

द मिररनुसार Joaquin Phoenix ने आधी जोकरला एक स्टॅंड अलोन सिनेमा मानला होता. पण आता त्याचं मत बदललं आहे. गेल्यावर्षी झालेल्या अनेक दावांनंतरही तो ही भूमिका पुन्हा साकरण्यास तयार आहे. सिनेमाच्या एका सूत्राने सांगितले की, सध्या सिनेमाबाबत चर्चा सुरू आहे. स्क्रीप्ट लिहिली जातीय आणि Joaquin Phoenix यात फार बिझी आहे. दिग्दर्शक टॉड फिलिप्स, Joaquin Phoenix आणि निर्माता ब्रॅडली कूपर लॉंग टर्म कमिटमेंटनुसार पुढील चार वर्षा जोकरचे दोन सीक्वल करण्याचा विचार करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत निर्माता ब्रॅडलीने सांगितले होते की, टॉडने जोकरच्या सीक्वलबाबत आयडिया दिली होती. तर Joaquin Phoenix ने लॉस एंजेलिस टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'जोकर सिनेमा रिलीज किंवा हिट होण्याआधी याच्या सीक्वलबाबत आम्ही बोलले होतो. जोकर सिनेमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या शूटींग दरम्यान मी टॉडला म्हणालो होतो की, आपण याच्या सीक्वलवर काम करणं सुरू करायचं का'.

टॅग्स :हॉलिवूडआंतरराष्ट्रीय