Join us  

गेम ऑफ थ्रोन्स फेम एमिलिया क्लार्क परतलीय मृत्यूच्या दाढेतून, मेंदूवर झाली होती शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 4:19 PM

गेम ऑफ थ्रोन्स या कार्यक्रमातील ड्रॅगन क्वीन ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका एमिलिया क्लार्क साकारत असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.

ठळक मुद्देएमिलिया क्लार्कने सांगितले की, ती 24 वर्षांची असताना तिच्या मेंदूचे ऑपरेशन झाले होते. तो काळ तिच्यासाठी अतिशय वाईट होता. त्या काळाची आजही आठवण झाल्यावर तिच्या अंगावर काटा येतो. त्यावेळी तिची अवस्था इतकी वाईट होती की, ती जिवंत राहीन का असा प्रश्न सगळ्यांना

गेम ऑफ थ्रोन्सचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या टीव्ही सिरीजचा पुढचा सिझन कधी येणार याची उत्सुकता नेहमीच लोकांना लागलेली असते. या टिव्ही सिरजचा पुढचा आणि शेवटचा सिझन या 14 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सिझनचे कथानक काय असणार, यामध्ये कोणकोणत्या व्यक्तिरेखा असणार याची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. 

गेम ऑफ थ्रोन्सच्या सगळ्याच सिझनमधील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या नव्या सिझनची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहात आहेत. पण या सगळ्यात या कार्यक्रमातील एका अभिनेत्रीविषयी धक्कादायक बातमी मीडियामध्ये आली आहे आणि ही गोष्ट त्या अभिनेत्रीने स्वतःच मीडियाला सांगितली आहे. गेम ऑफ थ्रोन्स या कार्यक्रमातील ड्रॅगन क्वीन ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडते. ही भूमिका एमिलिया क्लार्क साकारत असून तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या एका वाईट गोष्टीविषयी तिने नुकतेच तिच्या फॅन्सना सांगितले आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. 

एमिलियाने सांगितले आहे की, ती 24 वर्षांची असताना तिच्या मेंदूचे ऑपरेशन झाले होते. तो काळ तिच्यासाठी अतिशय वाईट होता. त्या काळाची आजही आठवण झाल्यावर तिच्या अंगावर काटा येतो. त्यावेळी तिची अवस्था इतकी वाईट होती की, ती जिवंत राहीन का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. 

एमिलियाने या गोष्टी सांगितल्यानंतर आता तिच्या आजारपणातले काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून तर तिच्या फॅन्सना प्रचंड वाईट वाटत आहे. हे फोटो 2011 मधील असून तिच्या ऑपरेशनच्या वेळी तिची तब्येत किती ढासळली होती हे या फोटोवरून आपल्याला लक्षात येत आहे. एमिलिया फँटसी ड्रामाचे चित्रीकरण करत असताना तिच्या मेंदूवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तिच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याने ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नव्हता.

टॅग्स :गेम ऑफ थ्रोन्स