Join us  

Googleवर का ट्रेंड होतायेत 'फ्रेंड्स' सीरिजमधील मोनिका, रोस गेल्लर आणि राशेल ग्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 11:01 AM

गुगलवर फ्रेंड्स सीरिजमधील मुख्य पात्रांबद्दल सर्च केलात तर तुम्हाला त्यांच्या संपूर्ण माहितीसह त्यांची खासियतही पाहायला मिळते आहे.

मार्टा कॉफमैन आणि डेविड क्रेन यांनी २२ सप्टेंबर, १९९४ मध्ये एक टीव्ही शो सुरू केला होता. या शोचं नाव आहे फ्रेंड्स. या टीव्ही शोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या शोचं एकूण दहा सीझन रिलीज झाले. या शोला २५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे गुगलने देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत ट्रिब्युट दिलं आहे.

गुगलवर फ्रेंड्स सीरिजमधील मुख्य पात्रांबद्दल सर्च केलात तर तुम्हाला त्यांच्या संपूर्ण माहितीसह त्यांची खासियतही पाहायला मिळते आहे. उदाहरण सांगायचं तर गुगलवर रॉस गेलर सर्च केल्यावर डाव्या बाजूला सोफा पहायला मिळतोय. या सोफ्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला रॉसच्या आवाजात सीट इथे तिथे होताना दिसते. सारखं सारखं सोफ्यावर क्लिक केल्यावर काही वेळानंतर सोफा तुटून जातो आणि रॉसच्या आवाजात ऐकू येतं की ओके, आय डोन्ट थिंक इट्स गॉन पिवट एनीमोर (OK, I don't think it's gonna pivot anymore).

जर तुम्ही या शोमधील दुसरं पात्र फीबी बुफे हे नाव सर्च केलं तर डाव्या बाजूला गिटार पहायला मिळतेय. त्या गिटारवर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काळी मांजर येते जी फोइबेच्या आवाजात गाणं गाताना दिसते. 

रेचल ग्रीनचं नाव गुगलवर सर्च केल्यावर डाव्या बाजूला रेचलसारखा हेअर कट पहायला मिळतो. तिथे क्लिक केल्यावर गुगल इमोजिसवर रेचलचा फोटो पहायला मिळतो.

फ्रेंड्स सीरिजमध्ये सहा फ्रेंड्सची स्टोरी आहे. या मित्रांची नाव आहेत रेचल ग्रीन, मोनिका गेलर, फीबी बुफे, जोई, चैंडलर बिंग व रॉस गेलर. या सहा फ्रेंड्स व्यतिरिक्त आणखीन एक पात्र आहे गंथर. या शोमध्ये या सहा जणांची जीवनशैली, मैत्री व भांडणं आणि सोबतच प्रेम पहायला मिळेल.फ्रेंड्सची शेवटची सीरिज २००४ मध्ये आली होती.