Join us  

लाच दिल्याप्रकरणी या अभिनेत्रीला सुनावण्यात आली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:50 PM

या अभिनेत्रीला लाच दिल्याप्रकरणी न्यायलयाने नुकतीच शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देफेलिसिटीने मुलीच्या प्रवेशासाठी लाच दिल्याने तिला 14 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. बोस्टनमधील कोर्टाने फेलिसिटीला 20000 डॉलर्सचा दंड ठोठावला असून 250 तास समाजसेवा करण्याचे देखील सांगितले आहे.

हॉलिवूड अभिनेत्री फेलिसिटी हफमॅनला आता जेलची हवा खावी लागणार आहे. पण फेलिसिटीला जेलमध्ये का जावे लागणार हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. तिने आपल्या मुलीच्या कॉलेजमधील प्रवेशासाठी संबंधितांना लाच दिली असल्याने तिला ही शिक्षा सुनावण्यात आली.

फेलिसिटीने मुलीच्या प्रवेशासाठी लाच दिल्याने तिला 14 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली. बोस्टनमधील कोर्टाने फेलिसिटीला 20000 डॉलर्सचा दंड ठोठावला असून 250 तास समाजसेवा करण्याचे देखील सांगितले आहे. तसेच एक वर्षं ती करत असलेल्या कामकाजावर न्यायालयाची नजर असणार असल्याचे म्हटले आहे. फेलिसिटीने देखील न्यायालयाचा आदर राखत तिला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्वीकारले आहे. तिन मे महिन्यात तिच्या मुलीच्या कॉलेजमधील प्रवेशासाठी 15000 डॉलर एका संस्थेला लाच म्हणून दिले होते. फेलिसिटीचे लग्न अभिनेता विलियम एच मेसीसोबत झाले असून या गुन्ह्यात ते आरोपी नव्हते. या गुन्ह्यात आणखी काही पालकांचा देखील समावेश आहे. पण या गुन्ह्यात शिक्षा देण्यात आलेली फेलिसिटी ही पहिली पालक आहे. 

फेलिसिटीची ही शिक्षा 25 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, डेस्परेट हाऊसवाईफ्स यामुळे नावारूपाला आलेल्या फेलिसिटीने ही शिक्षा स्वीकारताना सांगितले की, मी चुकीची असून मी एक गुन्हा केला असल्याचे मी मान्य करते. मी जे काही केले त्यासाठी मी कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देणार नाही. मी माझी मुलगी, नवरा, माझे कुटुंब आणि शैक्षणिक मंडळ यांची माफी मागू इच्छिते. तसेच कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जी मुले खूप मेहनत घेतात, त्यांच्या सगळ्यांची मी दोषी आहे.  

टॅग्स :हॉलिवूड