Join us  

फेमस पॉप सिंगर मॅडोना तिच्या फोटोमुळे चर्चेत, चाहते देतायेत अशा रिएक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 11:55 AM

काही महिन्यांपूर्वी मॅडोनाला कोरोनाचीही लागण झाली होती. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली होती.

अमेरिकी सिंगर मॅडोना आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीमध्ये एक पॉप आयकॉन म्हणून उदयास आली. पॉप संस्कृती समृद्ध करण्यात मोठ्या प्रमाणात मॅडोनाचे योगदान आहे. मॅडोना तिच्या सिंगिंगपेक्षा स्टायलिश  लुक आणि सौंदर्यामुळे जास्त चर्चेत असते. वयाच्या 62व्या वर्षी मॅडोना आजच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते. फिटनेसवर ती अधिक लक्ष देते. फिटनेस फ्रिक असलेली मॅडोना आता एका सेल्फी फोटोमुळे चर्चेत आली आहे. फोटो पाहून अनेकांचा मोठा धक्काच बसला आहे. कारण तिच्या पायांवर कप‍िंगचे निशान दिसत आहेत. बारकाईने या फोटोवर नजर टाकली तर तिच्या पायांना जबर दुखापत झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.  काही महिन्यांपूर्वी मॅडोनाला कोरोनाचीही लागण झाली होती. सोशल मीडियावर तिने याची माहिती दिली होती.

 

आता हा फोटो शेअर करत मॅडोनाने लिहीले की #recovery#cupping#beautifulscar. मैडोना पायावर दिसत असलेले  कप‍िंग स्कार्स ट्रीटमेंटसाठी लावण्यात आलेले आहे. कप‍िंग थेरेपी ही अशी एकट्रीटमेंट आहे. ज्यात गरम  कप आपल्या त्वचेवर ठेवले जातात.कप थेरेपी दमरम्यान स्वतःला रिलॅक्स वाटते. 

 

मध्यंतरी मॅडोनाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.व्हिडीओमध्ये आइस बाथनंतर एक कपभर युरिन पिताना दिसतेय. सोशल मीडियावर मेडोनाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.तिच्या मते, बर्फाच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर युरिन पिणे फायदेशीर असते. विशेष म्हणजे मेडोनाने औषधोपचार म्हणून युरिन पिण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिने पायाची जखम बरी करण्यासाठी युरिनचा वापर केला होता. 

मॅडोना अमेरिकी पॉप सिंगर, एक्ट्रेस, गीतकार आणि बिजनेसवुमन म्हणून आज ओळखली जाते. मॅडोनाचा जन्म मिशिगन मधील बे सिटीमध्ये 16 ऑगस्ट 1958मध्ये झाला होता.  80 च्या दशकापूसन तिला पॉप क्वीन नावाने ती प्रसिद्ध झाली. 'ला इस्ला बोनिता', 'पापा डोंट प्रीच', 'लाइक ए वर्जिन', 'फ्रोजन', 'हॉलीवुड'  'यू विल सी हैं' ही तिची गाणी सुपरहिट ठरली आहेत. मॅडोनाला तिचा जीवनप्रवास रूपेरी पडद्यावर मांडायचा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ती स्वतः करणार आहे.मॅडोनाने यापूर्वी दोन सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. 'फिल्थ अँड विस्डम' आणि 'डब्ल्यू. ई.' या चित्रपटांचं दिग्दर्शन तिनं केलं आहे.