Join us  

CoronaVirus: कोरोनासारख्या व्हायरसवर बनलाय हा सिनेमा, तब्बल ९ वर्षांनी होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:22 PM

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट होतोय सोशल मीडियावर व्हायरल

नेहमीच आपण ऐकत आलो आहे की चित्रपट सत्य घटनांनी प्रेरीत होऊन बनतात. मात्र कधी हे ऐकलं आहे का की एखादा सिनेमाची कथा आताच्या काळाशी मिळतीजुळती असल्यामुळे व्हायरल होतो आहे. २०११ साली स्टीव्हन सोडरबर्गच्या दिग्दर्शनाखाली बनलेला कंटेजियन चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. या चित्रपटात भयानक व्हायरस पसरल्यामुळे माजलेला हाहाकार दाखवण्यात आली आहे. 

कंटेजियन सिनेमा सार्स व स्वाईन फ्लूने प्रेरीत आहे. या चित्रपटात ग्वेनिथ पल्ट्रो, मारिऑन कोटिलार्ड, ब्रेयान क्रेन्सटन, मॅट डेमन, लॉरेन्स फिशबर्न, जूड लॉ, केट विंसलेट व जेनिफरने काम केले होते. हा चित्रपट २००३ साली आलेल्या सीवर एक्युरेट रेस्पीरेट्री सिंड्रोम म्हणजेच सार्स व २००९ साली आलेल्या स्वाईन फ्लू व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रेरणा घेऊन बनवला आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनोम गेब्रियेसिस यांनी सांगितले की, सर्वात मोठी चिंता ही आहे की व्हायरस सर्वात खराब स्वास्थ सुविधा असणाऱ्या देशात पसरल्या नाही पाहिजेत. जगभरात कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या ५८३३ पर्यंत पोहचली आहे. १५१ देशांमध्ये आतापर्यंत १५६५३३ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.

डब्लूएचओने जागतिक आपातकालीन परिस्थिती घोषित केली आहे. कोरोना व्हायरची दहशत जगभरात पहायला मिळते आहे.

ही परिस्थिती पाहता बऱ्याच लोकांनी कोरोना व्हायरसची तुलना कंटेजियन चित्रपटाशी केली आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या