Join us  

आधी कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यातच पाय कापावा लागला; दुहेरी संकटाचा सामना करतोय अभिनेता!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:18 PM

पायात रक्त गोठत असल्याने डॉक्टरांना सर्जरी करून या अभिनेत्याचा एक पाय कापावा लागला.

ठळक मुद्देनिकच्या उजव्या पायातील रक्त गेल्या काही दिवसांपासून गोठत होते. त्यामुळे त्याचे रक्त पातळ होण्यासाठी त्याला काही औषधं देण्यात आली होती. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्याचा उजवा पाय कापण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोनामुळे जगभरातील अनेकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता एका प्रसिद्ध अभिनेत्यावर कोरोनामुळे पाय कापण्याची वेळ आली आहे. त्याच्या पत्नीनेच याविषयी माहिती दिली आहे.

अभिनेता निक कॉर्डेरोला  काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. एक एप्रिलपासून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आयसीयुत असून त्याच्या तब्येतीत फरक जाणवत नाहीये. खरं तर निकचे कोरोनाचे पहिले दोन रिपोर्ट  निगेटिव्ह आले होते. पण तिसऱ्या रिपोर्टमध्ये त्याला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले. आता तर त्याच्या शरीरात रक्त गोठण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आता त्याचा एक पाय कापायला लागला आहे.

निकची पत्नी अमांडाने युएसए टुडेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते. तिने म्हटले होते की, निक गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातच आहे. त्याची तब्येत सुधारेल अशी आशा आम्ही करत होतो. पण डॉक्टरांनी आता एक धक्कादायक गोष्ट आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितली. निकच्या उजव्या पायातील रक्त गेल्या काही दिवसांपासून गोठत होते. त्यामुळे त्याचे रक्त पातळ होण्यासाठी त्याला काही औषधं देण्यात आली होती. पण यामुळे त्याचा रक्तदाब सतत वाढत होता. तसेच पायाच्या आतील भागात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा उजवा पाय कापण्याविषयी आम्हाला सांगितले. निकला वाचवणे अथवा त्याचा पाय कापणे असे दोनच पर्याय आमच्याकडे उपलब्ध होते. त्यामुळेआम्ही त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्याचा पाय सर्जरीने नुकताच कापण्यात आला असून त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या