Join us

ब्रॅड पिटचा अ‍ॅँजेलिनात नव्हे तर मुलांत गुंतला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 16:35 IST

हॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला घटस्फोट म्हणून अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्याकडे बघितले जाते. या दोघांमध्ये जरी घटस्फोट ...

हॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला घटस्फोट म्हणून अभिनेत्री अ‍ॅँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्याकडे बघितले जाते. या दोघांमध्ये जरी घटस्फोट झाला असला तरी, हे दोघे विभक्त आहेत, असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यास एकमेव कारण म्हणजे यांचे सहा मुले. कारण मुलांसाठी हे दोघेही एकमेकांपासून दूर राहणे पसंत करीत नाहीत. आता पुढे आलेल्या माहितीनुसार केवळ मुलांसाठीच पिट अ‍ॅँजेलिनासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हॉलिवूडलाइफ डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, पिट मुलांपासून अजिबात दूर राहू शकत नाही. त्यामुळे तो अ‍ॅँजेलिनासोबतचे संबंध सुधारण्यासाठी धडपड करीत आहे. अ‍ॅँजेलिना आणि पिटला ‘मॅडॉक्स (१५), पॅक्स (१३), जाहरा (११), शिलोह (१०) आणि आठ वर्षीय जुळे मुले नॉक्स  आणि विवियन असे सहा मुले आहेत. मुलांविषयी खासगीत बोलताना पिटने म्हटले की, अ‍ॅँजीने (अ‍ॅँजेलिना) मला किती त्रास दिला याचा मी फारसा विचार करीत नाही. मी सुरुवातीपासूनच केवळ मुलांकरिता अ‍ॅँजेलिनाबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील होतो. याबाबतचा मी एकप्रकारे निश्चियच केला असून, त्यावर मी आजही अडीग आहे, असे पिटने स्पष्ट केले. सूत्रानुसार पिट त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम करतो. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याची नेहमीच धडपड राहिली आहे. आपल्या मुलांना जगातील त्या सर्व सुविधा मिळाव्यात असा त्याचा नेहमीच आग्रह राहिला आहे. त्यामुळे तो अ‍ॅँजेलिनाबरोबरचे बिघडलेले संबंध सुधारविण्यावर भर देत आहे.