Join us

एका प्राचीन मंदिरात बोल्ड फोटोशूट करीत होती ‘ही’ मॉडेल; पोलिसांनी केली कारागृहात रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:59 IST

बेल्जियमच्या एका मॉडेलला तिने केलेले फोटोशूट चांगलेच अंगलट आले. कारण या फोटोशूटमुळे तिला चक्क कारागृहाची हवा खावी लागली. ही ...

बेल्जियमच्या एका मॉडेलला तिने केलेले फोटोशूट चांगलेच अंगलट आले. कारण या फोटोशूटमुळे तिला चक्क कारागृहाची हवा खावी लागली. ही मॉडेल इजिप्तमधील एका प्राचीन मंदिरात अश्लील फोटोशूट करीत होती. या मॉडेलचे नाव मारिसा पपेन असून, ती इजिप्तमधील लुक्सरमध्ये असलेल्या कारकं मंदिरात वाइल्ड फोटोशूट करीत होती. मात्र याचदरम्यान तिला पकडण्यात आले. मारिसा पपेन २५ वर्षांची असून, तिच्यासोबत असलेल्या एका फोटोग्राफरलाही जेलची हवा खावी लागली. काही दिवस जेलमध्ये राहावे लागल्यानंतर न्यायालयाने त्यांना चेतावणी देऊन सोडले आहे. मात्र अशातही मारिसा भलत्याच मुडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण जेलच्या बाहेर पडल्यानंतर मारिसाने म्हटले की, ‘मी बोल्ड फोटोज्च्या माध्यमातून स्वातंत्र्याचा संदेश देऊ इच्छित होते. मात्र पोलिसांनी त्यास अश्लील समजले. मारिसाच्या मते, या अगोदर तिने सुमारे ५० देशांमध्ये जाऊन अशाप्रकारचे फोटोशूट केले आहे. हे सर्व फोटोशूट तिने गेल्या दोन वर्षांमध्येच केल्याचा दावा केला आहे. मारिसाने म्हटले की, ‘मी तर इजिप्तच्या कल्चरचा प्रचंड आदर करते. मात्र पोलिसांनी मला पोर्न स्टार किंवा त्याप्रमाणे समजले. मारिसाचे हे वक्तव्य खळबळजनक असून, ती न्यायालयाच्या चेतावनीचा अवमान तर करीत नसावी ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. टाइम्स आॅफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मारिसाने मंदिर परिसरात असलेल्या सुरक्षारक्षकांना पैसे देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचदरम्यान त्याठिकाणी आणखी चार सुरक्षारक्षक पोहोचल्याने प्रकरण गंभीर झाले अन् तिला जेलची हवा खावी लागली. याविषयी बोलताना मारिसाने म्हटले की, इजिप्तच्या कारागृहात राहणे माझ्यासाठी खूप अवघड होते. कारण एका रूममध्ये जवळपास २० ते २५ कैद्यांना ठेवले जात होते. त्यातील बरेचसे कैदी रडत होते, तर काहींच्या शरीरातून रक्त येत होते. मारिसाच्या मते या अगोदर तिला अशा प्रसंगाचा कधीचा सामना करावा लागला नाही.