Join us  

Avengers: Endgame : या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी केली इतकी बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:19 AM

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल असा अंदाज लावण्यात येत होता. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास निर्माण करेन अशी सगळ्यांनाच खात्री होती.

ठळक मुद्देभारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाने आजवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली नव्हती.

‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या सिरीजमधील अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा शेवटचा चित्रपट असून या चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाच्या कित्येक शोची अॅडव्हान्स बुकिंग देखील झाली होती. केवळ भारतातच नव्हे तर देशभर या चित्रपटाला फॅन फॉलॉव्हिंग असून हा चित्रपट नुकताच जगभरामध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटासाठी पहिल्यांदाच 24 तास चित्रपटगृह सुरू राहिले असून अनेक चित्रपटगृहात या चित्रपटाचे 72 तास सलग प्रयोग होत आहेत. या चित्रपटाची तिकिटं हजारो रुपयांची असली तरी प्रेक्षक पैसे खर्च करून हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहात आहेत. या चित्रपटाला केवळ भारतातून नव्हे तर जगभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल असा अंदाज लावण्यात येत होता. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास निर्माण करेन अशी सगळ्यांनाच खात्री होती. भारतात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाने आजवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई केली नव्हती. ही आकडेवारी पाहाता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना देखील टक्कर देईन असे म्हणायला हरकत नाही. 

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट 26 एप्रिलला इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट 2500 स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. Avengers Infinity War या अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाचा प्रीक्वल असलेल्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 31.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 222.69 कोटी कमावले होते. या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम हा रेकॉर्ड मोडेल असे म्हटले जात आहे.

अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटाच्या जगभराच्या कलेक्शनचा विचार केला तर संपूर्ण देशात हा चित्रपट 24 एप्रिलला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने आतापर्यंत 601 मिलियन डॉलर म्हणजेच 4200 कोटी कमावले आहेत. त्यातील 1500 करोड रुपये केवळ चीनमध्येच कमाई केली आहे. 

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेमअॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर'