अॅँजेलिना जोलीचा अभिनयाला बायबाय!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 14:56 IST
पती ब्रॅड पिट याला घटस्फोट आणि मुलांच्या संरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत असलेली हॉलिवूड अभिनेत्री अॅँजेलिना जोली अभिनयाला गुडबाय करण्याच्या ...
अॅँजेलिना जोलीचा अभिनयाला बायबाय!!
पती ब्रॅड पिट याला घटस्फोट आणि मुलांच्या संरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत असलेली हॉलिवूड अभिनेत्री अॅँजेलिना जोली अभिनयाला गुडबाय करण्याच्या विचाराधीन आहे. तिच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलांना अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून ती अभिनयातून रिटायर्मेंट घेण्याचा विचार करीत आहे. मात्र दिग्दर्शन आणि पटकथा लेखनावर ती पुढेही काम करीत राहणार आहे. एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अॅँजेलिना सध्या तिचे संपूर्ण लक्ष आपल्या सहा मुलांच्या पालनपोषणाकडे देत आहे. सूत्रानुसार, ती सध्या फक्त मुलांकडे अन् चित्रपट निर्मितीकडे लक्ष देऊ इच्छिते. नॉटी गॉसिप या साप्ताहिकाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता अॅँजेलिना चित्रपटांमध्ये अभिनय करू इच्छित नाही. ती फक्त पटकथा लेखन आणि दिग्दर्शन याकडेच लक्ष देऊ इच्छिते. सध्या तिने अभिनयाला गुडबाय केला असून, ती हा वेळ मुलांमध्ये व्यतीत करीत आहे. वास्तविक अॅँजेलिनाच्या जीवनाचा पुढचा अध्याय मुलांचे पालनपोषण करणे आणि ज्या महत्त्वाच्या सामाजिक कार्याशी ती जुडलेली आहे, त्यास समर्थन देणे हा आहे. ती सध्या त्याच गोष्टीकडे लक्ष देऊ इच्छिते जे तिच्यासाठी प्राथमिकता आहे. अॅँजेलिना अभिनयाबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक समित्यांमध्ये ती महत्त्वपूर्ण पदांवर आहे. त्यामुळे अॅँजेलिनाने अभिनयाला जरी गुडबाय केला असला तरी, तिला या कामांकडे लक्ष द्यावेच लागणार आहे. दररम्यान, अॅँजेलिनाचा ‘मलेफिसेंट-२’ हा अखेरचा चित्रपट असणार आहे. तिने ‘फर्स्ट डे किल्ड माय फादर : अ डॉटर आॅफ कंबोडिया रिमेम्बर्स’ या चित्रपटाचे काम नुकतेच पूर्ण केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स हा अॅप्लिकेशनवर रिलीज केला जाणार आहे. अॅँजेलिनाच्या या रिटायर्मेंटच्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी निर्माण होईल, यात शंका नाही.