Join us  

न्यूड सीनमुळे चर्चेत असायची ही अभिनेत्री, आता या गोष्टीमुळे आहे चिंतीत, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 3:57 PM

आता कोणत्याही प्रकारचे काम करताना मला शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे.

अनेकदा ऑनस्क्रीन भूमिकेची गरज म्हणून कलाकारांना किसींग सीन, न्यूड सीन, बेड सीन करावे लागतात. मात्र सतत त्याच पठडीतल्या भूमिका केल्यामुळे रसिकांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो, त्यामुळे काळानुसार त्यांनी त्यांची आवड निवड नाही बदललीतर या गोष्टीचा त्यांना चांगलाच फटकाही सहन करावा लागतो. ही बाब बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सगळीकडे लागू पडते. सध्या अशाच बोल्ड सीन देणारी अभिनेत्रीला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. हॉलिवूड अभिनेत्री किएरा नाइटली.

ऑनस्क्रीन इंटिमेट सीन देण्यामुळे सतत चर्चेत असते. तसेच न्यूड सीन्स देण्यात तिचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे किएरा सर्वात जास्त पॉर्न वेबसाईट पोर्टलवर सर्वाधिक सर्च होणारी अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे. किएराला याच गोष्टीचा सध्या मनस्ताप सहन कारावा लागत आहे. त्यामुळे आता यापुढे सिनेमात अशाप्रकारचे सीन देणार नसल्याचा निर्धारच तिने केला आहे.

करिअरच्या सुरूवातीच्या काळात मला अशा प्रकारचे आक्षेपार्ह सीन देण्यात काहीच गैर वाटायचे नाही. मात्र आता माझे लग्न झाले आहे. मला दोन मुलं आहेत. आता करिअर पेक्षा माझे कुटुंब माझे सर्वस्व बनले आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे काम करताना मला शंभर वेळा विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा माझी मुलं माझे न्यूड सीन पाहतील तेव्हा ते काय विचार करतील या विचारानेच मी अस्वस्थ होत असते. त्यामुळे  काही गोष्टींवर वेळेआधीच निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले आहे.